शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना कॉन्स्टेबल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 19:34 IST

चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

जालना : चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र तुळशीराम वेलदोडे (४८ रा. रामनगर पोलीस कॉलनी) असे लाच स्वीकारणार्‍या कॉन्स्टेबलचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर नूतनवसाहत भागात देशी दारूचे दुकान आहे. वडिलांच्या निधनामुळे देशी दारू दुकानाचा परवाना तक्रारदारास आईच्या नावे करायचा होता. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यातून चारित्र पडताळणी अहवालाची आवश्यकता असल्याने तक्रारदार या संबंधीचे काम पाहणार्‍या गोपनीय शाखेतील राजेंद्र वेलदोडे यास २० मार्चला भेटले. चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी वेलदोडे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. कुठलाही गुन्हा दाखल नसताना अहवालासाठी पैसे कशाला लागतात, अशी विचारणा तक्रारदाराने केली. तेंव्हा वेलदोडे याने दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. आता पाच हजार रुपये द्या व उर्वरीत पाच हजार काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. नाईलाजास्तव तक्रारदाराने पाच हजार रुपये दिले. मात्र, उर्वरीत रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत  विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून कदीम जालना पोलीस ठाण्यात सापळा लावून वेलदोडे यास तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  उशिरापर्यंत सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक  आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर,  रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCorruptionभ्रष्टाचारJalanaजालना