शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2022 18:56 IST

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती. 

जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या चाचणीसाठी रविवारी दुपारी जालन्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती. 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरलेल्या गौणखनिज प्रकरणात मॉन्टो कॉर्लो कंपनीला ३०० कोटी माफ केले जातात, तर दुसरीकडे केवळ तीन हजार रुपये वीज बिल थकीत असले तरी शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार थांबवावा. केंद्र शासनाने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने समाजावर अन्याय झाला आहे. 

यामुळे शासनाने बंद केलेली अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शेतकरी रतन शिंदे, असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, जिल्हा सचिव गौतम लांडगे, आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. यामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.

शेतकऱ्यांनीही मांडल्या व्यथामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर स्वागत कार्यक्रमस्थळी आले होते. त्यावेळी एका शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मावेजा कमी असून, त्यात लक्ष घालावे, अशी मागणी केली. दानवे यांनी पाहणी केली जाईल सांगितले, तर सत्कार स्वीकारल्यानंतर निघालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर एका शेतकऱ्याने अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याची व्यथा मांडली. मात्र, ताफ्यातील गर्दीत मंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद संबंधित शेतकऱ्याला मिळाला नाही.

टॅग्स :JalanaजालनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग