शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

वाळू तस्करांना मदत करणाऱ्या सव्वाशे जणांविरुध्द महसूलची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:53 IST

अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला (बु.) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.कुरण, पाथरवाला (बु.), बाबाची थडी येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधवाळू उत्खनन, वाहतूक थांबता थांबत नाही. तर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या शेतजमीन धारकांनी अवैधवाळू तस्करांकडून चिरीमिरी घेऊन अवैध साठेबाजी करण्यासाठी जागा, अवैधरीत्या वाळू भरून ट्रॅक्टर, हायवांना जाणे-येणे साठी शेतीतून रस्ते करून दिले होते. त्यामुळे महसूल अथवा पोलिसांचे पथक आले तर पथक गोदापात्रात येईपर्यंत तस्कर वाहनांसह पसार होत होते.विधानसभा निवडणुकीत संपताच उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी वाळू तस्करांविरूध्द कारवाईचा सपाटा लावला आहे. तोच वाळू तस्करांबरोबर त्यांना मदत करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती पर्यावरणा'चा -हास होत आहे. या बाबीचा विचार करून उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांकडून गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. अवैध वाळू साठे, वाहतुकीसाठी शेतजमीन, रस्ते देणा-या शेतजमीन मालका विरूद्ध सातबारा उता-यावर नावे असलेल्या नुसार मंडळाधिकारी श्रीपाद मोताळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय विश्वनाथ भारती, वामनबुआ विश्वनाथ भारती, भागीरथी विश्वनाथ भारती, राजू फुलारे, संभा मोरे, (सर्व रा.सर्व पाथरवाला बु., ता. अंबड), राजेंद्र बबनराव कुरणकर, आयोध्या बबनराव कुरणकर, कमलबाई बबनराव कुरणकर, भीमराव रामा कांबळे, राक्षे, (रा.सर्व कुरण ता.अंबड) व इतर शंभर अशा सव्वाशे जणांविरुद्ध संगनमत करून अवैधवाळू उत्खनन, साठे, वाहतूक केल्याने पर्यावरणा'चा नैसर्गिक संपत्तीचा रास होऊन नैसर्गिक वातावरण दूषित केल्याप्रकरणी महसूल खात्याने गोंदी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.गोपनीय माहितीनुसार तक्रारअवैधवाळू तस्करांना अवैध वाळू साठे करण्यासाठी, अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी ज्या- ज्या मालकांनी शेतजमीन दिल्या आहेत, अशांची गोपनीय माहिती घेऊनच तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या त्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर नावे असलेल्यांची नावेच तक्रारीत आहेत. - शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी, अंबड

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी