शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, १५ सैनिक ठार; अनेक प्रांतांमध्ये गोळीबार
3
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
4
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
5
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
6
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
7
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
8
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
9
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
10
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
11
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
12
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
14
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
15
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
16
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
17
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
18
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
19
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
20
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम

दिलासादायक ! मराठवाड्यात ६० हजार २६९ मजुरांना मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:39 IST

कोरोना विषाणूचे थैमान आणि लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.

ठळक मुद्देजालना जिल्ह्यात सर्वाधिक मजुरांची संख्या कोरानाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार मजुरांना दिलासा 

- दीपक ढोले 

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेकारीची कुºहाड आलेल्या मजुरांना दिलासा मिळाला असून, मराठवाड्यात मग्रारोहयोंतर्गत मराठवाड्यातील ६० हजार २६९ जणांच्या हाताला काम मिळाले आहे. यात जालना जिल्हा संख्येच्या दृष्टीने अव्वल असून येथील १२ हजार ३४१ मजुरांना काम मिळाले आहे. तर दुसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा असून, तेथील ५३0 ग्रामपंचायतीत सुरु झालेल्या १0४९ कामावर १0 हजार १८0 जण काम करीत आहेत.

कोरोना विषाणूचे थैमान आणि लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाल्याने हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनेक मजूर आपल्या गावी अथवा राज्यात परतले होते आणि शासनाने मग्रारोहयोंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रारंभी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याविषयी गावपातळीवर ग्रामस्थांनी आंदोलने करून ग्रामपंचायतीकडे काम देण्याची मागणी केली. त्यानंतर झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानुसार प्रशासनाने योग्य नियोजन करून ३३५ ग्रामपंचायतीमध्ये ९८४ कामे सुरू केली.  मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थित आहे.

मजुरांना मागणीप्रमाणे काम मिळेल मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतस्तरावर कामे उपलब्ध करून दिली आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि सीईओ निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कामे उपलब्ध करून देण्यात आली. मराठवाड्यात मग्रारोहयोच्या कामावर जालना जिल्ह्यात सर्वाधिक मजूर उपस्थित आहेत. या पुढेही मजुरांना मागणीप्रमाणे काम उपलब्ध करून दिले जाईल.- संजय इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि. प. जालना

मराठवाड्यात मजुरांची जिल्हानिहाय उपस्थितीजिल्हा        मजूरजालना        १२३४१औरंगाबाद        ६६९९परभणी        ६१४४नांदेड        ७८२८हिंगोली        ७०४५बीड        ३३३२लातूर        ६७००उस्मानाबाद        १०१८० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीMaharashtraमहाराष्ट्र