शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जाती आता आल्या, पण बाबासाहेब आणि मराठ्यांचा जवळचा संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:40 IST

जयंती साजरी करताना जरुर नाचा परंतु अगोदर बाबासाहेब वाचा, असे प्रतिपादन धनंजय पाटील यांनी येथे बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आम्ही परंपरेचे राजे परंतू आपण तर विद्येचे राजे आहात, असे म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला होता. बाबासाहेबांना शिक्षणासाठी सर्वप्रथम शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड होते. जाती आता आल्या परंतु मराठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जवळचा संंबंध होता. आता परिवर्तनाचं युग आल्याने जातीच्या पलिकडे जाऊन पाहण्याचा आपला दृष्टीकोन झाला पाहिजे, त्यामुळे जयंती साजरी करताना जरुर नाचा परंतु अगोदर बाबासाहेब वाचा, असे प्रतिपादन धनंजय पाटील यांनी येथे बोलताना केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते देशातील सद्यकालीन परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर पाचवे गुंफताना पाटील बोलत होते. यावेळी विचारपीठावर चळवळीतील ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. एम. साळवे, संजय खोतकर, सिमोन सुतार, सुनील साळवे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती.देशातील विद्यमान स्थितीवर भाष्य करताना त्यांनी अनेक पैलू उलगडून दाखविताना बहुजन आणि विशेषत: मराठा समाजावर आपल्या व्याख्यानातून प्रखर विचार मांडले. ते म्हणाले की, मराठा समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नाहक नको त्या गोष्टी पेरल्या जातात. मात्र, मराठ्यांचा आणि डॉ. बाबा साहेब आंबेडकरांचा खूपच जवळचा संबंध होता. अशी किती तरी नावे घेता येतील की त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सर्वात आधी मराठा समाजाने हात पुढे केले होते. जय भवानी जय शिवाजी हा नारा आजचा नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा नारा आहे. म्हणजेच बाबासाहेब आणि मराठा समाज वेगळे नव्हतेच. इतिहास याचा साक्षीदार आहे.सर्वात प्रथम बाबासाहेबांना भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञान कुणी सांगितलं? तर ते मराठ्यांनी सांगितलं, हेही लक्षात घ्या, असे सांगून ते म्हणाले की, आजच्या युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला नाचण्याऐवजी त्यांना वाचले पाहिजे. ती खरी काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही-आम्ही भक्त झालो म्हणूनच बाबासाहेबांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. एकूणच समाजामध्ये द्वेष भावना पसरविण्याचे काम त्या काळात मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीmarathaमराठाSocialसामाजिक