शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निषेधाने गाजला मुख्यमंत्र्यांचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:27 IST

मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुख्यमंत्र्यांचा दौरा अवघ्या २४ तासांत ठरल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने ही दुष्काळी आढावा बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.शनिवारी या बैठकीचे आयोजन करताना पोलिसांनी जो तगडा बंदोबस्त लावला होता, त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह वकील, न्यायिक अधिकाऱ्यांना बसल्याने एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पोलिसांमध्ये आधी शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर नंतर सौम्य लाठीमारात झाल्याने गोंधळात भर पडली.जिल्ह्यात केवळ ६१ टक्केच पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली होती. त्या पार्श्वभूमीवर पूर्वी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जालना दौºयावर येऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घ्यावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन २४तासांत त्यांचा दौरा निश्चित करून तसे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले होते. हे निर्देश मिळताच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांना सूचित करून माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश दिले होते.शनिवारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर १२.२० मिनिटांनी जालन्यात उतरले. त्यानंतर त्यांनी तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जि.प. सदस्य जयमंगल जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्याचा आग्रह धरला.त्यातूनच भोकरदनचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये यांच्या सोबत वाद झाला. यातूनच चिडलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची धरपकड करून सौम्य लाठीमार केला. यामुळे वातावरण संतप्त झाले होते. जयमंगल जाधव यांना हाताला जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.वकिलांनी नोंदवला निषेधशनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने वाहतुकीत बदल केले होते. तसेच न्यायालयत जाण्यासाठीच्या मार्गावरून न्यायिक अधिकाºयांसह वकिलांना प्रतिबंध करण्यात आल्याने मोठी अडचण झाली. यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि वकिलांमध्ये शाब्दिक वादही झाले. या संदर्भात वकिलांच्या शिष्टमंडळाने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच न्यायालयाच्या परिसरात सर्वांनी एकत्रित येऊन पोलिसांच्या अरेरावीचा निषेध नोंदविला.पोलिसांच्या या भूमिकेचा फटका हा पक्षकारांनाही बसला. त्यांना न्यायालयात येताना अनेक अउच्णींना तोंड द्यावे लागले.निषेध नोंदविणा-यांमध्ये जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक तारडे, अ‍ॅड. सी. डी. देशपांडे, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. एन. डी. देशपांडे, अ‍ॅड. आर. जी. देशमुख, अ‍ॅड. गजानन मांटे, अ‍ॅड. संजीव गायकवाड, अ‍ॅड. रमेश उंचे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. शैलेश देशमुख, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, अ‍ॅड. रोहित बनवसकर, अ‍ॅड. सुमित मोरे, अ‍ॅड. प्रज्ञेश कुलकर्णी, अ‍ॅड. दत्तात्रय लिखे, अ‍ॅड. संदीप घुगे, अ‍ॅड. अभिषेक सतकर, अ‍ॅड. दीपिका ढवले, अ‍ॅड. चित्रा वाघ यांच्यासह अन्य वकिलांची यावेळी उपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीagitationआंदोलन