शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:06 IST

रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळपासून युवकांमध्ये उत्साह संचारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध संस्था, संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श प्रत्येकाने कृतीत उतरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सार्वजनिक मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी केले. शिवछत्रपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गांधी चमन येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.सकाळी उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. दुपारी ४ वाजता गांधीचमन येथे शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उद्योजक संजय खोतकर, भास्कर दानवे, माजी आ.अरविंद चव्हाण, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, तहसीलदार बिपीन पाटील, डॉ.संजय लाखे पाटील, इक्बाल पाशा, शेख महेमूद, अंकुश राऊत, विजयकुमार पंडित, दिगंबर पेरे, विश्वास भवर, उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष देविदान, कार्याध्यक्ष रवींद्र राऊत, अंकुश पाचफुले, सचिव अ‍ॅड.रवींद्र डुरे, विमल आगलावे, प्रा.मनीषा भोसले, शीतल तनपुरे, आयेशा खान, रसना देहेडकर, दिनकर घेवंदे, प्रा.राजेंद्र भोसले, राजेंद्र राख, सतीश जाधव, खंडेश जाधव, रमेश अग्रवाल, विलास तिकांडे, गणेश गुजर, इलियास लखारा आदींची उपस्थिती होती.मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. तर गोविंद गर्जना ढोल पथक आणि प्रयाग शाळेच्या चिमुकल्यांनी लेझीम पथकावर धरलेला ठेका सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. इक्बाल पाशा, अंकुश राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र भोसले आणि आशिष रसाळ यांनी केले तर अंकुश पाचफुले यांनी आभार मानले.शहिदांना श्रध्दांजली...पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीच्या वतीने प्रारंभी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. देश दु:खात असल्याने मान्यवरांच्या स्वागत समारंभास फाटा देऊन केवळ छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले भगवे रूमाल देण्यात आले.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSocialसामाजिक