शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 19:11 IST

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पकडली; पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल

टेंभुर्णी (जालना ) : लग्नासाठी इच्छुक तरुणांच्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन त्यांची नंतर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश टेंभुर्णी पोलिसांनी सोमवारी केला. याप्रकरणी पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने लग्नासाठी मुली दाखवून अनेक तरुणांना फसवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे सविता माळीच्या शेतात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी आल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने माळीच्या शेतात धाड टाकली. पोलिसांना पाहताच तेथील लोकांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.  यावेळी औरंगाबाद येथून मुलीचे स्थळ दाखवून भडगाव ( जि.जळगाव) व फुलंब्री (औरंगाबाद ) येथील दोन युवकांना लग्नासाठी बोलाविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तरुणांना प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन लग्नासाठी त्यांच्या कुटुंबासह बोलावून घेतले होते. परंतु,  दोन्ही वर पक्ष एकाच वेळी समोरासमोर आल्याने टोळीचा भांडाफोड झाला. 

दोघांमध्ये वाद झाल्याने लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जळगाव येथील वधू पक्षाकडील लोकांनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी (रा. सातेफळ), सुनिता बाळूमामा माळी (रा.सावंगी वरगणे), सुषमा सुभाष बेळगे (रा. पवन नगर, वाळूज पंढरपूर ), अनिल जगन्नाथ बनकर (  रा. शृंगारवाडी ), शिला मनोहर बनकर (रा. एकतुनी ता.पैठण), शितल बाबुराव निकम (रा.विसरवाडी ता.पैठण ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. 

सूत्रधार फरार, फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येणार या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या मोबाईलमध्ये विविध मुलामुलींचे बायोडाटा आढळून आले आहेत. धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी, नांदेड येथील काही तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून  फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी सूत्रधार सविता माळी फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई सपोनि रविंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस कर्मचारी पंडित गवळी, वसुंधरा भांडेकर, छाया निकम, अशोक घोंगे, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, हरी शिरसागर, गजेंद्र भुतेकर ,मंगेश शिंदे , गणेश खाडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना