शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खतसाठा प्रकरणात कारखान्याच्या मालकांविषयी इतकी सहानुभूती कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 15:36 IST

दोन दिवसांनंतरही तपासाला गती नाही

- गजानन वानखडे जालना : कोणत्याही कारखान्याला परवाना देताना त्याच्या मालकासह सर्व इत्थंभूत माहिती कृषी अधीक्षक कार्यालयात घेतली जाते. असे असताना जालन्यात उघडकीस आलेल्या बनावट सेंद्रिय खत प्रकरणात जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी अद्यापही संबंधित कारखान्याच्या मालकाच्या नावाने तक्रार दिलेली नाही. त्यामुळे मालकांविषयी इतकी सहानुभूती कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

दोन दिवसापासून चंदनझिरा पोलिसात फिर्याद दाखल होऊनही शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळणारे महाभाग अद्यापही पोलिसांच्या हातात लागलेले नाहीत.  कृषी विभाग आणि पोलिसांच्या कलगीतुऱ्यामुळे तपासाला अद्यापही गती न मिळाल्याने सर्वसामान्यात संताप आहे.

जालन्यापासून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील राजलक्ष्मी फर्टिलायझरच्या गोदामावर ४ मे रोजी कृषी विभागाने छापा मारुन तब्बल ६३ लाख रुपयांचा बनावट खताचा साठा जप्त केला होता. या खतामध्ये लिंबोळी तसेच पिकांच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या खतांच्या नमुन्याची तपासणी केली असता, ते सर्व बनावट आढळून आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी कृषी विभागाने चंदनझिरा परिसरातील औद्योगिक वसाहत परिसरात वरद फर्टिलायझर या सेंद्रीय खत तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन तब्बल ९० लाख रुपये किमतीचे साडेचारशे मेट्रिक टन बनावट सेंद्रीय खत जप्त केले. दोन्ही कारवाईत तब्बल दीड कोटींचा बोगस खताचा साठा जप्त केला. दोन्ही बनावट कारखाने कोणाचे हे कृषी विभागाला माहित असताना अद्यापही त्या मालकांविरुध्द तक्रार करण्यात आलेली नाही, हे विशेष.

मालकांच्या नावानिशी फिर्याद हवीखताच्या दोन्ही बनावट कारखान्यांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याला दोन दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अद्यापही चंदनझिरा पोलिसांनी तपासाला गती दिली नाही. कृषी विभागाने  मालकांच्या नावानिशी फिर्याद देणे गरजेचे होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे, पण तसे झाले नाही. त्यामुळे पुन्हा कृषी विभागाकडे पत्रव्यवहार करुन संबंधितांची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagricultureशेतीJalanaजालना