शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

१० कोटींची तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:17 IST

जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर नोंदणी केलेल्या साडेआठ हजार शेतकऱ्यांपैकी ४ हजार ९ शेतक-यांची १० कोटी ४७ लाख ८१ हजार रूपये किंमतीची ३७ हजार ७६६ क्विंटल तूर नाफेडने खरेदी केली आहे.४ हजार शेतक-यांची तूर खरेदी अद्यापही बाकी असल्याचे चित्र आहे. १५ मे पर्यंतच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने हमीभाव केंद्रावर शेतक-यांची लगबग दिसून येत आहे.नाफेडने तूर खरेदी बाबत जाचक अटी लावूनही जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रावर तब्बल साडेआठ हजार शेतक-यांनी त्या - त्या ठिकाणच्या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी खरेदी केलेली १ लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त तूर वेअर हाऊसमध्ये पडून आहे. जागाच नसल्याने खरेदी केलेली तूर ठेवावी कोठे यामुळे जाणिवपूर्वक आधीपासूनच तूर संथगतीने खरेदी केल्याने शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आत्तापर्यंत फक्त ४ हजार ९ शेतक-याची तूर खरेदी करण्यात आली आहे.उर्वरीत साडेचार हजार शेतक-यांची तूर खरेदी बाकी आहे. त्यातच नाफेडने अचानक १८ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परिणामी शेतक-यांना हमीभावापेंक्षा १५०० रूपये कमी दराने तूर विकण्याची वेळ आल्याने शेतक-यांनी संताप होता. तब्बल आठवडा भर तूर खरेदी बंद राहिल्याने आपली तूर खरेदी होईल की, नाही याची चिंता शेतक-यांना सतावत होती. शेतक-यांचा वाढता दबाव बघून नाफेडने बंद केलेली खरेदी २७ एप्रिल पासून पुन्हा सुरू केली. मात्र १५ मे पर्यतच खरेदी करण्याचे निर्देश नाफेडने दिले आहेत. यामुळे नोंदणी केलेल्या शेतक-यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यातच कडक उन्ह, लग्नसराई आणि आठवड्याच्या आलेल्या सुट्या यामुळे देखील तूर खरेदी केंद्रावर शेतकरी गर्दी करू लागले आहेत. तूर खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. एकूणच कांद्या प्रमाणेच तूरीनेही शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले.जालना : ८ कोटी शेतक-यांच्या खात्यातनाफेडने खरेदी केलेल्या १० कोटी ४७ लाख रूपयांच तूर खरेदी केलेली आहे. ३० एप्रिल पर्यत शेतक-यांच्या बँक खात्यात ८ कोटी रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती आहे. उर्वरीत उर्वरीत २ कोटी ४७ लाख रूपये नाफेडकडून येणे बाकी आहे. तसेच जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन या केंद्रावर ३३५ शेतक-याकडून ४ हजार २८० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मात्र त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड