शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली

By शिवाजी कदम | Updated: June 15, 2023 17:24 IST

तपोवन शिवारात यापूर्वीही जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

राजुर: भोकरदन तालुक्यातील तपोवन येथे ओंकार कढवणे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत चाऱ्याच्या गंजीस आग लावून पसार झाल्याची घटना बुधवार 14 जून रोजी रात्री घडली. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लावणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शेजारीच असलेली जनावरे बालबाल बचावली आहेत.

तपोवन येथील शेतकरी ओंकार कढवणे यांनी शेतातील बखारीत जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा साठवून ठेवला होता. यामध्ये पाच ट्रॅक्टर भूसा आणि ७५० कडब्यांच्या पेंढ्या होत्या. परंतु अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणातून चारा गंजीस आग लावली. या घटनेत शेतकऱ्याचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

बखारी शेजारी राहणारे ज्ञानेश्वर कढवणे हे रात्री ११च्या सुमारास उठले असता त्यांना चाऱ्याची गंजी पेटल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ओंकार कढवणे यांना ही माहिती दिली. ओंकार कढवणे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत संपूर्ण चाऱ्याची गंजी जळून खाक झाली होती. आगीमुळे सभोवतालची झाडे होरपळून निघाली.कडबा गंजीच्या  बाजूला गोठयात जनावरें बांधलेली होती.सुदैवाने आग तिकडे पोचली नाही यामुळे ती बचावली. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.वैशाली पवार करीत आहे.

यापूर्वीही अनेक घटना तपोवन शिवारात यापूर्वीही  जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओंकार कढवणे यांचे ठिंबक सिंचनचे साहित्य पेटवून दिले होते. तसेच रामनाथ मालुसरे आणि राजेंद्र मालुसरे यांचे  शेडनेट अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले. विश्वंभर मालुसरे या शेतकऱ्याची सोयाबीनची गंजी पेटून दिली होती. त्यामुळे तपोवन शिवारात जाळपोळीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रfireआगJalanaजालना