शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नूतन वसाहत येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:29 IST

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना जुना जालना भागातील नूतन वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््याजवळ सोमवारी रात्री घडली. यात सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.नूतन वसाहत येथील रहिवासी एकनाथ गणपत पाटेकर (६५) हे सोमवारी दुपारी परिवारासह कडेगाव येथे गेले होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेजारी राहणारे सोनटक्के यांनी फोनवरून घराचे दोन्ही दरवाज्याचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे सांगितले. माहिती मिळताच ते परिवारासह घरी आले. गेटचे व दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे त्यांना दिसले. घरात जाऊन पाहिले असता, कपाटाचे दार उघडून सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५५ हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेले. यात २७ हजाराची ठुशी, ८१ हजाराचे गंठण, १३५०० रूपयांचे कानातले डूल, १३५०० रूपयांची सोन्याची चेन, २७ हजारांचे कानातली फुले, असा २ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.गुन्हा दाखल : तपासासाठी पथकघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक बनसोड, कर्मचारी खार्डे हे करीत आहेत. एकनाथ गणपत पाटेकर यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.नूतन वसाहतमध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. यापूर्वीही अनेक चोऱ्या आणि मोटारसायकल तसेच कार लांबविण्याचे प्रकार घडले होते. त्या तपासाचेही मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी