शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाथबाबा गल्लीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 01:13 IST

शहरातील नाथबाबा गल्ली भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ५० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील नाथबाबा गल्ली भागात चोरट्यांनी घरफोडी करून ४ लाख ५० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना ४ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ पूर्वी घडली. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची तपासणी केली.शहरातील नाथबाबा गल्ली भागात राहणारे पवन जैस्वाल हे ४ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. जैस्वाल यांच्या घराचे कुलूप तुटल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पाहिले. ही घटना समजताच पवन जैस्वाल यांचे चुलत बंधू सुरेंद्र सुरेशकुमार जैस्वाल यांनी सदरबाजार पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम ४ लाख ५० हजार रूपये, सोन्या-चांदीच्या दागिने लंपास केल्याचे समोर आले. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचरण करण्यात आले होते. या प्रकरणी सुरेंद्र जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नागवे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीjewelleryदागिने