शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात घरफोडी; झिरपी फाट्यावर दाम्पत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:06 IST

चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चोरट्यांनी शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकी परिसरातील एक घर फोडून ६० हजारांचे दागिने, दुचाकी लंपास केली. अंबड तालुक्यातील झिरपी फाट्याजवळ दाम्पत्यास मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तर घनसावंगी तालुक्यातील घानेगाव शिवारातून २० हजार रूपयांच्या कोंबड्या चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जालना शहरातील इंदेवाडी पाण्याच्या टाकीच्या पाठीमागील स्वराज रेसिडेन्सी मध्ये रमाकांत मधुकर बधनापूरकर यांचे घर आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ६० हजाराचा मुद्देमाल व एक १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी रमाकांत बधनापूरकर यांच्या तक्रारीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि मोरे हे करीत आहेत.अंबड - शहागड मार्गावरील झिरपी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू आहे. या कामाजवळील एका टीनच्या शेडमध्ये सुनील आत्माराम जाधव हे बुधवारी रात्री पत्नी व मुलीसमवेत झोपले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी शेडमध्ये प्रवेश करून दाम्पत्यास लाकडी दांड्याने मारहाण करीत त्यांच्याकडील ११ हजार ४०० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सुनील जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घनसावंगी तालुक्यातील घानेगाव गावच्या शिवारात गौतम किसनराव तिनगोटे यांचे शेत आहे. या शेतातील शेडमध्ये कोंबड्यांचे पालन करण्यात आले होते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या शेडमधील २० हजार रूपये किंमतीच्या कोंबड्या चोरून नेल्या. या प्रकरणी गौतम तिनगोटे यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी