शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला दरोड्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:55 IST

चमनचे हात बांधून, मुख्य दरवाजा तोडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, व्यावसायिक आणि पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लुटारुंनी त्या घरातून पळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वॉचमनचे हात बांधून, मुख्य दरवाजा तोडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, व्यावसायिक आणि पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लुटारुंनी त्या घरातून पळ काढला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील मंठा चौफुली भागातील शीतलनगर भागात घडली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील मंठा चौफुली भागातील शीतलनगर परिसरात बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोद यांचे घर आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुनोद यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. घराच्या सुरक्षेसाठी असलेल्या वॉचमनचे हात बांधून त्याला धमकी देत मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. मुख्य दरवाजा आणि बेडरुमचा दरवाजा तोडताना झालेल्या आवाजाने मुनोद यांना जाग आली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. तसेच शेजारी आणि नातेवाईकांनाही भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मुदोन यांनी दक्षतेने पोलिसांशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नागरिक जागे झाल्याची आणि पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पळाले. मात्र, सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस