शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बजेट म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर; आर्थिक तरतूद नसतानाही केल्या योजनांच्या घोषणा; राजू शेट्टींची जोरदार टीका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:52 IST

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

जालना : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

खा. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना असून, आगामी काळात या मुद्द्यांवर राजकारण संघटनेतर्फे केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शेतमाल हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अमलबजावणी आदी मुद्दयांवर  भाजपकडून अपेक्षाभंग केला असून, या सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहे. आर्थिक वर्षाचे बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आरोग्य विमा, कृषी विभागासाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रांनुसार दीडपट हमीभाव देण्याचे म्हटले असले तरी ए-२ आणि सी-२ मधील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ शेतक-यांना कितपत होईल, याबाबत सांशकता आहे. बजटमध्ये संशोधनासाठी कुठलीही तरतूद नाही. कृषी विद्यापीठांत अनेक जागा रिक्त आहेत. शेतक-यांना तंत्रज्ञान पुरविले जात नाही. केवळ घोषणा करुन विकास कसा साधता येईल, असा सवालही त्यांनी केला.

मराठवाड्यात १०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टिने सरकारकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसून येत नाही. कर्जमाफीची योजना जाहीर करुन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचा एकही शेतकरी आपल्याला भेटला नसल्याचे ते म्हणाले. शेतक-यांचा सातबारा कोरा करण्यासह विविध प्रश्नांवर येत्या काळात संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. पत्रकार परिषदेस वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोकळे, साईनाथ चिन्नदोरे, गोविंदप्रसाद मुंदडा, सुरेश गवळी आदी उपस्थित होते. 

छोटे राज्य विकासाचे मॉडेल...स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असून, छोटे राज्य हे विकासाचे मॉडेल होऊ शकतात. तेलंगणा, पंजाब, हरियाणा आदी राज्ये याचे उत्तम उदाहरण आहेत. म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले. 

तूर विकण्याची घाई नको.. डाळवर्गीय पिकांचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतक-यांनी सध्या तूर व इतर डाळी विकण्यास घाई करु नये. बाजार हा पुरवठा आणि मागणी यावर चालत असतो. भाव वाढल्यानंतर शेतक-यांना आपला माल विकावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीBudget 2018अर्थसंकल्प २०१८