जालना : अटक न करण्यासाठी मंठा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी सपोउपनि. मुशिरखान कबीरखान पठाण (५२, रा. बुºहाणनगर, जालना) यांच्याविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारदार व त्याच्या बायकोमध्ये नेहमीच भांडण होत होते. याप्रकरणी तक्रारदाराच्या बायकोने तक्रारदाराविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, सात ते आठ दिवसांपूर्वी मंठा पोलीस ठाण्याचे सपोउपनि. पठाण यांनी तक्रारदार व त्यांच्या आई-वडीलांना मंठा पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.त्यानंतर तुमच्या पत्नीने तुमच्याविरुध्द तक्रार दाखल केली असल्यामुळे तुम्हाला अटक करावी लागले. तुम्हाला अटक करायची नसेल तर १० हजार रुपये द्यावे लागले. तेव्हा तक्रारदार हे म्हणाले की, मी पैसे घेऊन येतो, असे सांगून तेथून निघून गेला. तक्रारदाराने याची तक्रार लाच लूचपत विभागाकडे केली.सदरील तक्रारीवरुन लाच लुचपत विभागाने मंठा येथे जावून पडताळी केली असता, पठाण यांनी तडजोडी अंत ५ हजार रुपयाच्या लाचेची मागणई करुन लाच स्विकारली असता रक्कमेसह त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पाच हजाराची लाच; पोलीस जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:05 IST
जालना : अटक न करण्यासाठी मंठा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत विभागाने ...
पाच हजाराची लाच; पोलीस जाळ्यात
ठळक मुद्देजालना : अटक न करण्यासाठी मागितली लाच