शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काँग्रेससाेबतची युती तोडून दाखवाच; बबनराव लोणीकरांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

By महेश गायकवाड  | Updated: March 30, 2023 18:33 IST

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून भाजप व शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

परतूर : स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर यांच्या कार्याचा अभ्यास न करता त्यांचा अपमान होईल असे वक्तव्य राष्ट्रीय पक्षाचे नेते करीत आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे. उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबतची युती ताेडून दाखवावी. असे आव्हान भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी दिले आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची युवा पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने भाजपाच्यावतीने राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेविषयी माहिती देण्यासाठी परतूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अवमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. असे सांगत राहुल गांधी व काँग्रेसच्या काही नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. हा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्षासोबतची युती उद्धव ठाकरेंनी तोडून दाखवावीच, असे आव्हान बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिले. या पत्रकार परिषदेस भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजयुमोचे संपत टकले, माऊली कोंडके, विलास घोडके, सतीश बोराडे यांची उपस्थिती होती.

२८८ मतदारसंघात निघणार सावरकर गौरव यात्रानव्या पिढीला सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप व शिवसेनेतर्फे ही यात्रा काढण्यात आली आहे. ३० मार्चपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. ५ एप्रिल रोजी परतूर शहरात ही यात्रा काढण्यात येणार आहे. तर  ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार असल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBabanrao Looneykarबबनराव लोणीकरJalanaजालना