शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन असल्याची संधी साधत जालन्यात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 16:24 IST

आ. कैलास गोरंट्याल यांचे पीए मोहन अबोलेंचे घर फोडले 

ठळक मुद्दे१२ तोळ्यांचे  दागिने आणि रोकड लंपास

जालना : वयोवृध्द आईला कोरोनाची लागण झाल्याने मोहन अबोले यांच्या सर्व कुटुंबाला एका खाजगी हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. ही संधी साधून त्यांच्या नवीन जालन्यातील कादराबाद भागातील रंगारगल्लीतील घरात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. त्यात साडेचार ते पाच लाख रूपयांचे  बारा तोळे सोन्याचे दागिने आणि  ५० हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती अबोले यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. 

गेल्या आठवड्यात कदराबाद भागातील आ. कैलास गोरंट्याल यांचे खाजगी स्वीय सहायक म्हणून मंत्रालयात काम करणारे मोहन अबोले यांच्या वृध्द आईला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांच्या सर्व परिवाराला येथील प्रशासनाने क्वारंटाइन केले. मोहन अबोल यांच्या सुनेला नऊ महिन्यांचा लहान मुलगा आहे, त्यामुळे त्या मुलाच्या वडिलांना  आणि मुलाच्या  पत्नीला घरी राहू द्यावे आम्ही अन्य सर्वजण क्वारंटइन होतो, असे अबोले यांनी विनंती केली होती. परंतु, ती विनंती यंत्रणेने फेटाळून लावली. त्यांना जालन्यातील एका खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी अबोले यांना शेजाऱ्यांनी फोनवरून तुमचे घर चोरट्यांनी फोडल्याची माहिती दिली. अबोले यांनी तातडीने घरी धाव घेऊन पाहिले असता, कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच आई आणि पत्नीच्या कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम ४० ते ५० हजार रूपये चोरीस गेल्याचे अबोले यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच सदरबाजार पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार नोंदविली आहे. या घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख व अन्य अधिकाऱ्यांनी अबोले यांच्या घरी जाऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही पाचारण केले होते.परंतु अद्याप पर्यंत या चोरीतील आरोपी हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले. 

प्रशासनाचे कागदी घोडे आमदारांच्या स्वीय सहायकासह त्यांच्या परिवाराला आठ दिवसांपूर्वी क्वारटांइन करण्यात आले होते. त्यांना ज्या खाजगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे एकदाही कुठला अधिकारी अथवा डॉक्टर फिरकला नाही. तसेच क्वारंटाइनचे शिक्केही त्यांच्या हातावर मारले नाहीत. विशेष म्हणजे त्या हॉटेलमध्ये कोण येतोय - कोण जातोय याची नोंदही नाही. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आनुभव खुद्द मोहन अबोले यांनी बोलून दाखविल्याने प्रशासन कोरोनाबाबत किती सतर्क आहे, हेच यातून दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस