शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या पिशव्यात बोगस बियाणे; जालन्यात कृषी विभागाची गोदामावर धाड

By महेश गायकवाड  | Updated: June 10, 2023 14:29 IST

गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला.

- गणेश पंडितकेदारखेडा (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरातील एका गोदामात बाजारातून विकत घेतलेले बियाणे नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरून तो बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात येत होते. या गोदामावर कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापा मारून तब्बल २५० क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणांचा साठा जप्त केला. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. जालना जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढल्याने बाजारात विविध कंपन्यांचे बियाणेही दाखल झाले आहेत. सोयाबीन बियाण्याची वाढती मागणी पाहता काहींनी बोगस बियाणांचा धंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. केदारखेडा -भोकरदन मुख्य रस्त्यावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक सोयगाव देवी शिवारातील एका गोदामात बाजारातून खरेदी करण्यात आलेले सोयाबीन नामांकित बियाणे कंपन्यांच्या बॅगमध्ये भरण्यात येत होते. हे बियाणे बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार होते. याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यांनतर कृषी विभागाच्या पथकाने या गोदामावर धाड टाकली. यात तब्बल चारशे क्विंटलपेक्षा अधिक बोगस बियाणे नामांकित कंपन्याच्या बॅगमध्ये भरण्यात आल्याचे आढळून आले.  हे संपूर्ण सोयाबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पथक येताच गोदामातील मुख्य सूत्रधार पसार झाले. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी एस. व्ही. कराड, कृषी अधिकारी आर. एल. तांगडे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, विस्तार अधिकारी काकडे, मंडळ कृषी अधिकारी रामदास भिसे, कृषी सहायक सुनील रोकडे, प्रभाकर पाबळे, ए. बी, भोंबे, प्रवीण भोपळे यांनी केली. 

गोदाम शेतकी उत्पादक कंपनीचेज्या गोदामात हा काळाबाजार सुरू होता. ते गोदाम पूर्णा- केळना शेतकरी प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत सुरू असल्याचे समजते. या गोदामात फुले संगम, बायडन आदी कंपन्याच्या पिशव्यात बाजारातील सोयाबीन भरण्यात येत होते. या बियाण्यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचे आढळून आले. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार गोदामात अंदाजे २६५ क्विंटल बियाणे आढळून आले. तसेच सोयाबीनचे लहान-मोठे दाणे, माती मिश्रित रॉ मटेरियल आदी गंभीर बाबीही याठिकाणी आढळून आल्या.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagricultureशेतीFarmerशेतकरीJalanaजालना