शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'यापुढे विधानसभा लढवणार नाही; पोरगं वेटिंगवर आहे', भाजपच्या बड्या आमदाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:59 IST

BJP MLA : 'माझे चिरंजीव निवडणुकीसाठी सज्ज आहेत.'

जालना: परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यापुढे विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. 'मी म्हातारा झालो नाही, पण इथून पुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही. पोरगं वेटिंगवर आहे,' असे स्पष्ट आणि थेट वक्तव्य त्यांनी केले.

वाढदिवसाच्या सोहळ्यात राजकीय ‘बॉम्ब’

लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील वाटूर येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी लोणीकर यांची लाडू तुला करण्यात आली. याच व्यासपीठावरून बोलताना त्यांनी राजकीय निवृत्तीचे आणि उत्तराधिकाराचे स्पष्ट संकेत दिले. 'मी थकलो नाही, पण आता तरुण पिढीला संधी मिळायला हवी. माझे चिरंजीव निवडणुकीसाठी सज्ज आहेत,' असे म्हणत त्यांनी मुलासाठी विधानसभा मतदारसंघ मोकळा करण्याचे लोणीकरांनी जाहीर केले.

लोकसभेची तयारी?

विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करतानाच लोणीकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, 'पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार आहे,' असे सांगत त्यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली. आता लोणीकर खरंच पुढील विधानसभेतून माघार घेणार का? रावसाहेब दानवेंसारखे दिग्गज नेते असताना पक्ष त्यांना जालन्यातून लोकसभेसाठी संधी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP MLA Loniikar Announces Retirement from Assembly, Son Awaits Chance

Web Summary : Babanrao Loniikar, BJP MLA, will not contest assembly elections. He announced his son is ready, hinting at succession. He's open to contesting Lok Sabha elections if the party gives chance.
टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरBJPभाजपाJalanaजालनाpartur-acपरतूर