शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:54 IST

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

- दादासाहेब जिगेमठपिंपळगाव ( जालना) : प्रजासत्ताक दिनी शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या एका दिवसात राज्यभरात प्रसिद्ध झाला. त्याच्या शाळेतील भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्याचा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण खळखळून हसत आहे. त्याच्या या भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भुरळ घातली असून, त्यांनी कार्तिकला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिनी त्याने शाळेत भाषण केले. त्याने आपल्या भाषणात लोकशाही आणि लोकशाहीतील स्वातंत्र्याची व्याख्या आपल्या अनोख्या अंदाजात आणि सोप्या भाषेत सांगितली. त्याच्या भाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकशाहीत भांडू शकता... दोस्ती करू शकता.. प्रेमाने राहू शकता. मला तर मोक्कार फिरायला, झाडावर माकडासारखे चढायला आवडते. असे भोऱ्याने आपल्या भाषणात सांगितले. त्याने आपल्या निरागस वाणीतुन आणि अनोख्या शैलीत केलेले हे भाषण सगळ्यांनाच भावत आहे. 

कार्तिकला लाडाने गावात भोरे असे संबोधतात. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्याच्या वडिलांकडे अवघी दोन एकर शेती आहे. कार्तिक घरातील व्यक्तींबरेाबरच अख्ख्या गावाचा आणि शाळेतील शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. कार्तिकला एक माेठी बहीण आणि एक भाऊ आहे. आई घरकाम, तर वडील ट्रॅक्टर चालवतात. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी त्याच्याशी व्हिडीओ काॅलद्वारे संवाद साधून त्याला २ फेब्रुवारी रोजी परतूर तालुक्यातील वाटूर येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास येण्याचे निमंत्रण दिले आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री भोऱ्याची भेट घेणार आहेत. भोऱ्याला नेत्रदोष आहे. त्याच्या या आजारावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे उपचारासाठी दाखविण्यात येणार असल्याचे दादासाहेब थेटे यांनी सांगितले.

सतीश घाटगेंनी स्वीकारले कार्तिकचे पालकत्वघनसावंगी तालुक्यातील समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे नेते सतीश घाटगे यांनाही कार्तिकला भेटण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी रेवगाव येथे जाऊन त्याची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी कार्तिकचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च ते उचलणार आहेत.

टॅग्स :JalanaजालनाEknath Shindeएकनाथ शिंदे