शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील सूत्रधार दिलीपसिंग राजपूत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 20:05 IST

जळगाव जिल्ह्यातील पळसखेडा मिराचे येथून एलसीबीने घेतले ताब्यात

- फकिरा देशमुखभोकरदन (जि.जालना) : भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत याच्या मुसक्या गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या. जळगाव जिल्ह्यातील पळसखेडा मिराचे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेच्या ४७ दिवसांनंतर त्याला पकडण्यात यश आले आहे.

भोकरदन येथे सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा आरोग्य विभाग व पोलिसांनी ७ जुलै रोजी संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला होता. कारवाईवेळी मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंग राजपूत हा इमारतीवरून उडी मारून पळून गेला होता. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना आरोपी करण्यात आले असून, त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. राजपूत याला पकडण्याचे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली दीड महिन्यापासून पथक राजपूतच्या मागावर लावले होते. दोन दिवसांपूर्वी त्याने पोलिसांना हुलकावणी दिली होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. योगेश उबाळे, कर्मचारी श्यामल कांबळे, कृष्णा तंगे, धीरज भोसले, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, योगेश सहाणे यांनी गुरुवारी गुप्त माहितीवरून जळगाव जिल्ह्यातील नेरीजवळ असलेल्या पळसखेडा मिराचे या गावातील एका नातेवाइकाच्या शेतात लपून बसलेल्या डॉ. दिलीपसिंग राजपूत याला जेरबंद केले आहे.

१० आरोपी अद्याप फरारया प्रकरणात अद्याप १० आरोपी फरारच आहेत. त्यांना अटक करण्यासाठीही पोलिसांकडून भोकरदन व एलसीबी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना