शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

घाणेवाडी ग्रामपंचायतीवर भागवतबापू बावणे यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

जालना : तालुक्यातील घाणेवाडी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली भागवतबापू बावणे यांनी वर्चस्व राखले आहे. त्यांच्या पॅनलच्या राधाबाई पंडित ...

जालना : तालुक्यातील घाणेवाडी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली भागवतबापू बावणे यांनी वर्चस्व राखले आहे. त्यांच्या पॅनलच्या राधाबाई पंडित पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

जालना तालुक्यात सरपंचपदासाठी घाणेवाडी ग्रामपंचायत ही एकमेव अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होती. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी निवडणूक झाली. याप्रसंगी अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी सी.एल. राठोड तसेच ग्रामसेविका अलका धांडे यांची उपस्थिती होती. यावेळी राधाबाई पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवतबापू बावणे यांनी सांगितले की, गत पंचवार्षिकमध्ये केलेल्या विकास कामांची ही पावती असून, सर्वांच्या सहकार्याने विकास निधी खेचून आणून भरपूर कामे केली जाईल. तर नवनिर्वाचित सरपंच राधाबाई पवार यांनी आरक्षणाचे महत्त्व विशद केले. लहान-मोठ्या समस्याची पूर्ण जाणीव असून, आपण महिलांसाठी विशेष काम करू, असेही त्या म्हणाल्या. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन

जालना तालुक्यातील घाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधाबाई पंडित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना प्रमाणपत्र वितरित करताना अध्यासी अधिकारी सी.एल. राठोड, ग्रामसेवक अलका धांडे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष भागवतबापू बावणे आदी.