शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार ०३१ रुग्णांना सेवेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:48 IST

आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे. २०१८-१९ मध्ये तब्बल २३ हजार ०३१ रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. किंबहुना त्यांचे प्राण वाचविण्यात या सेवेचा उपयोग झाला आहे.२६ जानेवारी २०१४ ला काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १०८ नंबर रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. रस्त्यांवरील अपघात, मारामारी, भाजणे, हृदयाचे आजार, विषबाधा, प्रसूती, विद्युत धक्का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि सर्वप्रकारचे रुग्ण अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा याद्वारे मिळतात.२०१७ -२०१८ यावर्षात १९ हजार ५५३, तर २०१८ -२०१९ यावर्षात २३ हजार ०३१ अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा मिळाली. आता त्यात तब्बल तीन हजारांनी वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, कोणताही अपघात झाल्यास त्या रुग्णाला तात्काळ कोणत्याही रुग्णालयात घेऊन जाऊन उपचार करणे. तसेच गर्भवतीची प्रसूती कोणत्याही (सरकारी, खाजगी) रुग्णालयात व्हावी, असे सरकारचे धोरण आहे. दरम्यान, घटना घडल्यापासून अवघ्या दहा मिनिटांत १०८ नंबरची रुग्णवाहिका घटनास्थळी येते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही रुग्णवाहिका उपयोगी पडत आहे. दरम्यान, जालना जिल्हाभरात १०८ नंबरच्या १५ रुग्णवाहिका आहे. जिल्ह्यात ३० वैद्यकीय अधिकारी असून, या रुग्णवाहिकेवर ३५ चालक कार्यरत आहेत.असे चालते कामरुग्ण अथवा इतर कोणाकडून १०८ क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला, ते शोधले जाते. त्याचवेळी ‘जीपीएस’च्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते. दरम्यान, अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन स्थिती असल्यास नातेवाईक रुग्णाला खाजगी रुग्णालयातही घेऊन जाऊ शकतात.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्यSocialसामाजिक