शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार अपमान करत असल्याने व्यसनी पित्यानेच केली मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 14:24 IST

मृताचे वडील व्यसनी आणि कर्जबाजारी असल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत

जालना : रामखेडा हत्या प्रकरणात मुलगा वारंवार चारचौघात अपमान करतो याचा राग मनात धरून पित्यानेच मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे आज उघडकीस झाले. संतोष हनुमान कुरधने (२२) असे मृत मुलाचे नाव असून बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी हनुमान कुरधने यांना पहाटेच ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या संतोषचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली होती.  मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोषचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. 

पोलिसांनी याबाबत तपास केला असता संतोषचे वडील हनुमान कुरधने याच्या जबाबात तफावत आढळून आली. तसेच संतोषवर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या दृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. गावात माहिती घेतली असता हनुमान ने व्यसनी असल्याने कर्जबाजारी होते यातून बाप-लेकात सतत वाद होत अशी माहिती मिळाली. जबाबात तफावत आणि इतर माहितीवरून पोलिसांनी आज पहाटे हनुमान यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा काबुल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

यांनी केला तपास पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीसचे यशवंत जाधव, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आणि पोलीस कॉ. अनिल काळे आदी कर्मचाऱ्यांनी तपास केला. 

टॅग्स :MurderखूनFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना