शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:41 IST

जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत.

ठळक मुद्देचोरट्यांकडून लक्ष्य : कोट्यवधी रूपये राम भरोसे, चोरट्यांचे फावते...

जालना : जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत. त्यात सर्व मिळून अंदाजित तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी असून, रोजची उलाढाल ही काहीशे कोटी रूपयांमध्ये होते.एवढे सर्व व्यवहार होत असतांना अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा हा सुरक्षीत राहावा म्हणून बँक, पतसंस्थांमध्ये ठेवताता. मात्र, या संस्थाच जर पैशांच्या सुरक्षेकडे एवढे दुर्लक्ष करत असतील तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे जालन्यातील एसबीआय शाखेची तिजोरी फोडण्याचा झालेला प्रयत्न पुरेसा बोलका आहे.जालना शहर हे व्यापार आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे दररोजच कोट्यवधी रूपयांचे व्यवहार हे नित्याचेच आहेत. त्यातच हजारो कोटी रूपयांच्या ठेवी जालन्यातील जवळपास ३५ राष्ट्रीयकृत आणि ५७ सहकारी बँका, पगारदारांच्या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या आहेत. एकूणच हे पैसे ग्राहकांना बँकांमध्ये रांगांमध्ये उभे राहून काढण्यासाठी जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु हे एटीएमच लांबवून त्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार जालन्यातही घडले होते. परंतु एवढे सर्व होऊनही बँकांचे व्यवस्थापन हे सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जालना शहरातील गांधीचमन भागातील एसबीआय बँकेच्या शटरच्या कुलूपा तोडून एका चोरट्याने थेट बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्या तिजोरीत ५४ लाख रूपये होते, अशी माहिती बँक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. जर तिजोरी फोडण्यात चोरट्याला यश आले असते तर, मोठा अनर्थ ठरला असता असे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच या प्रकारामुळे पोलिसही धास्तावले आहेत.

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस