शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

जालन्याच्या खासदारासाठी औरंगाबादकरांचा कौल निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:55 AM

जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे औरंगाबादकर काय कल देतात हे महत्वाचे असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघात एकूण ९ लाख २२ हजार ८९५ मतदार आहेत. तर जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. त्यामुळे औरंगाबादकर काय कल देतात हे महत्वाचे असणार आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदारसंघ राज्यात चर्चेत आला होता. पण खोतकरांचे बंड शमल्यानंतर दानवेंचा रस्ता मोकळा झाला. मात्र, भीषण पाणीटंचाई, वादग्रस्त वक्तव्य आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यामुळे जालना मतदार संघामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.२३ तारखेला जालना मतदार संघातील मतदान होणार आहे. रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. दानवे यांनी २०१४ मध्ये औतडेंचा पराभव केला होता. मात्र, यावेळचे गणित थोडं वेगळं असू शकते. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील मतदारराजा नाराज आहे. दानवेंनी केलेले वादग्रस्त वक्तव्य, काही गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार यामुळे दानवेंच्या अडचणी वाढु शकतात. दरम्यान, त्यामुळे दानवेही जोमाने कामाला लागले असून, ते मतदार संघ पिजून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.शहरातील मतांचाही बसू शकतो फटकाजालना मतदार संघात येणाऱ्या जालना, भोकरदन, परतूर नगरपलिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर बदनापूर नगरपंचायत फक्त भाजपच्या ताब्यात आहे. तसेच जाफराबाद नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरातील मतांचा फटका दानवेंना बसू शकतो.सिल्लोड काँग्रेस, पैठण सेना तर फुलंब्री भाजपच्या ताब्यातसिल्लोड विधानसभा मतदार संघात आमदार अब्दुल सत्तार आहे. तर फुलंब्री मतदार संघात भाजपचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आहे. तसेच पैठणमध्ये सेनेचे आमदार आहे. त्यामुळे याचा दानवेंना फायदा होईल की तोटा हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाAurangabadऔरंगाबाद