शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 00:32 IST

जिल्हा बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहसनाबाद : शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना बुधवारी पहाटे समोर आली. विशेष म्हणजे, त्या तिजोरीत तब्बल २३ लाख ९० हजार २०० रूपयांची रक्कम होती.हसनाबाद शहरातील हसनाबाद- भोकरदन मार्गावर जालना जिल्हा बँकेची शाखा आहे. शाखा व्यवस्थापक रईस काद्री हे बुधवारी सकाळी बँकेत आले असता मागील शटर उचकटलेले दिसले. त्यांनी ग्रामस्थ, पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमक्ष मुख्य शटर उघडण्यात आले.फौजदार गुलाब पठाण यांनी घटनेचा पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर, सपोनि एम. एन. शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तिजोरी उघडून पाहिल्यानंतर चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न फुटल्याने बँकेतून काढता पाय घेतला. त्यामुळे तिजोरीतील तब्बल २३ लाख ९० हजार २०० रूपये सुरक्षित असल्याचे दिसून आले.या प्रकरणी शाखा व्यवस्थापक रईस काद्री यांच्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि एम.एन. शेळके हे करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.चोरटे सीसीटीव्हीत कैदहसनाबाद जिल्हा बँकेतून बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडणारे दोन चोरटे एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.एकच कर्मचारीहसनाबाद शाखेतून शासकीय अनुदान वाटपासह इतर व्यवहार केले जातात. जवळपास २० हजार ग्राहक आहेत. मात्र, या कामांसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. घटनेनंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :theftचोरीbankबँकCrime Newsगुन्हेगारी