शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अन्नामृतच्या आहार प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये या उदार भावनेतून डॉ. राधाकृष्ण दास यांनी २००४ मध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये या उदार भावनेतून डॉ. राधाकृष्ण दास यांनी २००४ मध्ये मुंबई येथे सुरु केलेल्या अन्नामृत फाऊंडेशनच्या जालना येथील प्रकल्पाच्या केंद्रीय स्वयंपाक गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी दीड वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.अन्नामृत फाऊंडेशनच्या जालना शाखेची स्थापना १७ जून २०२० रोजी झाली असून, गत काही महिन्यांपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होती. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा उत्तम असा प्रतिसाद या योजनेस मिळत असल्याने याचा विस्तार करण्याचे संस्थेने ठरविले आहे. गरजूंना आरोग्यदायी पौष्टिक आहार देऊन भूक आणि कुपोषण कमी करण्याचे ध्येय समोर ठेवून जालना जिल्ह्यातील अनेक शाळांत हा उपक्रम राबविला जात आहे.अन्नामृत फाऊंडेशन जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित शाळा इत्यादीमध्ये शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत येणा-या शालेय पोषण आहाराचे वितरण करते. जालना शहरामधील राष्ट्रीय हिंदी विद्यालय - प्राथमिक व माध्यमिक, दानकुंवर हिंदी विद्यालय -प्राथमिक व माध्यमिक, सरस्वती भुवन विद्यालय, मत्सोदरी विद्यालय अशा विविध सात शाळांमध्ये शिकणा-या ७ हजार विद्यार्थ्यांसाठी सेवा देत आहे. मुकेश अग्रवाल, अनिल टेकाळे, डॉ. संतोष मद्रेवार, सुनील रायठठ्ठा, रासगोविंद दास, अनया अग्रवाल, सुदर्शन पोटभरे, गणेश नखाते अन्नामृत जालना समितीचे आदी सदस्य या प्रकल्पाचे कामकाज पाहतात.अन्नामृतच्या डॉ.बद्रीनारायण बारवले केंद्रीय स्वयंपाकगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून ५० हजार विद्यार्थ्यांना सेवा देण्यास सक्षम असा प्रकल्प जालना शहरात सज्ज झाला आहे. सुमारे ४० हजार चौरस फूट जागेवर १२ हजार चौरस फूटांचे मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. जालना तसेच जवळील ३० ते ३५ कि.मी. अंतरावरील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना सेवा देण्याचे कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून होत असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. मंगळवारी दुपारी २ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणा-या या लोकार्पण सोहळ्यास आरोग्यमंंंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सिमोन थोरस्टेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे.सन २००४ मध्ये ९०० विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला हा प्रकल्प सध्या १२ लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. विविध ८ राज्यांमध्ये २१ अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृहे निर्माण करण्यात आली आहेत. अन्नामृत फाऊंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील समिती सदस्य कुशल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. राधाकृष्ण दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे कामकाज चालते.अन्नामृतअन्नामृत फाऊंडेशनच्या जालना प्रकल्पाच्या निर्मितीसाठी महिको मोन्सॅन्टो बायोटेक (इंडिया) ने ६ कोटींचा निधी सामाजिक दायित्व निधीतून दिला असून गोल्डन ज्युबिली एज्युकेशनल सोसायटीची ४० हजार चौरस फूट जागा वार्षिक एक रु पया भाडेतत्त्वावर या प्रकल्पासाठी देण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSocialसामाजिकStudentविद्यार्थी