शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कडवंचीत होणार अ‍ॅम्युनिटी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:50 IST

जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर या आठ पदरी होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाचे काम जालना जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. संपूर्ण राज्यात जिल्ह्याचे काम ६० टक्क्यापेक्षा अधिक झाले आहे. या रस्त्यालगत जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे. यासाठी मुंबई येथील एक पथक नुकतेच कडवंची येथे भेट देऊन गेले. याच दरम्यान रखडलेला इंटरचेंजचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून जातो. त्यासाठी ११५४ शेतकऱ्यांची जवळपास ५१० हेक्टर जमीन संपादित केल्यानंतर महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे काम सर्वात जास्त प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा रस्ता आठ पदरी असून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकºयांना पाचशे ते सातशे कोटी रुपये मावेजा म्हणून मिळाले आहे.जालना येथून हा महामार्ग सर्वात जवळून जात आहे. शहरापासून अवघ्या आठ कि़मी. वरुन जाणार असल्याने येथून या मार्गावर जाण्यासाठी आणि येथे येण्यासाठी इंटरचेंज (चढउतार पॉईट) करण्यात येणार आहे. हा इंटरचेंज नेमका कुठल्या भागात होणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही; परंतु हा निर्णय देखील येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निधोना येथील ट्रक टर्मिनस बाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.गायरान जमीन : ४० एकर जागा सहज उपलब्ध होणारतीन दिवसांपूर्वी कडवंची येथे मुंबई येथून अभियंत्यांचे पथक पाहणीसाठी आले होते. यामध्ये कडवंची गावाजवळ मोठ्या प्रमाणावर शासकीय गायरान जमीन आहे. येथे अ‍ॅम्युनिटी सेंटर उभारण्यासाठी चाळीस एकर जागा सहज उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅम्युनिटी सेंटर सोबतच रुग्णालय, पेट्रोलपंप, शाळा आदींसह हॉटेल उभारणीदेखील होऊ शकते त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सागिंले. यावेळी कडवंचीचे ग्रामस्थही उपस्थित होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार