कडवंचीत होणार अ‍ॅम्युनिटी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:50 AM2020-01-08T00:50:17+5:302020-01-08T00:50:59+5:30

जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे.

Ammunition center to be built in Bitter | कडवंचीत होणार अ‍ॅम्युनिटी सेंटर

कडवंचीत होणार अ‍ॅम्युनिटी सेंटर

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई-नागपूर या आठ पदरी होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाचे काम जालना जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. संपूर्ण राज्यात जिल्ह्याचे काम ६० टक्क्यापेक्षा अधिक झाले आहे. या रस्त्यालगत जालना तालुक्यातील कडवंची येथे रोड साईड अ‍ॅम्युनिटी सेंटर ४० एकर परिसरावर होणार आहे. यासाठी मुंबई येथील एक पथक नुकतेच कडवंची येथे भेट देऊन गेले. याच दरम्यान रखडलेला इंटरचेंजचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातील २५ गावांमधून जातो. त्यासाठी ११५४ शेतकऱ्यांची जवळपास ५१० हेक्टर जमीन संपादित केल्यानंतर महामार्गाचे काम मार्गी लागले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हे काम सर्वात जास्त प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा रस्ता आठ पदरी असून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकºयांना पाचशे ते सातशे कोटी रुपये मावेजा म्हणून मिळाले आहे.
जालना येथून हा महामार्ग सर्वात जवळून जात आहे. शहरापासून अवघ्या आठ कि़मी. वरुन जाणार असल्याने येथून या मार्गावर जाण्यासाठी आणि येथे येण्यासाठी इंटरचेंज (चढउतार पॉईट) करण्यात येणार आहे. हा इंटरचेंज नेमका कुठल्या भागात होणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही; परंतु हा निर्णय देखील येत्या काही दिवसांमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. निधोना येथील ट्रक टर्मिनस बाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गायरान जमीन : ४० एकर जागा सहज उपलब्ध होणार
तीन दिवसांपूर्वी कडवंची येथे मुंबई येथून अभियंत्यांचे पथक पाहणीसाठी आले होते. यामध्ये कडवंची गावाजवळ मोठ्या प्रमाणावर शासकीय गायरान जमीन आहे. येथे अ‍ॅम्युनिटी सेंटर उभारण्यासाठी चाळीस एकर जागा सहज उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅम्युनिटी सेंटर सोबतच रुग्णालय, पेट्रोलपंप, शाळा आदींसह हॉटेल उभारणीदेखील होऊ शकते त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सागिंले. यावेळी कडवंचीचे ग्रामस्थही उपस्थित होते.

Web Title: Ammunition center to be built in Bitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.