शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अंबड पालिकेची सभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी वादळी ठरली. या सभेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटून आगामी काळात सत्ताधारी भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.अंबड नगरपालिकेमध्ये कायदा धाब्यावर बसवून अनेक गोष्टी केल्या जात असल्याची चर्चा सुरु झाल्याने नैतिकतेचा दावा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जनतेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी वादळी ठरली. या सभेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटून आगामी काळात सत्ताधारी भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.अंबड नगरपालिकेमध्ये कायदा धाब्यावर बसवून अनेक गोष्टी केल्या जात असल्याची चर्चा सुरु झाल्याने नैतिकतेचा दावा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे.बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छतेच्या कंत्राटापोटी सचखंड एजन्सीला देण्यात आलेल्या १९ लाख रुपयांच्या धनादेशाबाबत ठरावावर चर्चेला सुरुवात होताच, सत्ताधारी पक्षाच्या स्वच्छता सभापती गंगाधर वराडे यांनीच यावर जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृह स्तब्ध झाले. स्वच्छतेचे कंत्राट मार्च अखेरीस संपल्यानंतर पालिकेने स्वच्छतेच्या कंत्राटाची निविदा काढणे गरजेचे होते, मात्र, काही विशेष कारणांनी असे झाले नाही. एप्रिल महिन्यामध्ये पालिकेच्या कर्मचा-यांनी स्वच्छतेचे काम केले, या कर्मचाºयांना पालिकेने वेतन अदा करायला हवे होते मात्र या काळातील.कामाच्या मोबदल्यात खाजगी एजन्सीला १९ लाख रुपयांचा धनादेश अदा करण्याची गरजच काय असा आक्षेप वराडे यांनी घेतला. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले व माजी नगराध्यक्षांचे पती काकासाहेब कटारे यांनी या सर्व प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.स्वच्छता सभापती वराडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सदरील विषय उचलून धरल्याने सत्ताधारी भाजपा व नगराध्यक्षा संगीता कुचे यांची कोंडी झाली.यानंतर आठवडी बाजाराच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित सदस्यांना मांडला. कंत्राटाची मुदत जून महिनाअखेरीस संपल्यानंतरही सदरील कंत्राटदार बेकायदेशीरपणे आठवडी बाजारात येणाºया व्यापाºयांकडून वसुली करत असल्याची बाब पालिका सदस्यांनी मांडली. विशेष म्हणजे सदर कंत्राटदाराला आठवडी बाजाराची वसुली करण्यासंदर्भात पालिकेच्या जबाबदार पदाधिका-याने अभय दिल्याचा आरोपही सदस्यांनी करताच वातावरण पुन्हा एकदा तापले.या दोन मुद्यांसह इतर अनेक बाबींविषयी सभागृहात वादळी चर्चा झाली, विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेचा कारभाराचा भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची टीका करत, पालिकेत नियमांचे पालन करुन काम करणे एकवेळ कठीण आहे. मात्र, नियमबाह्य कामे लवकर होत असल्याचा आरोप करत पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले.विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप करत भाजपा सत्तेत आली.मात्र, केवळ दीड वर्षाच्या कार्यकाळातच सत्ताधारी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होऊ लागल्याने पारदर्शक कारभाराचा गवगवा करणाºया भाजपा नेत्यांभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले आहे.बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता सभापती असलेले वराडे यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याने सत्ताधारी भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले.

टॅग्स :Politicsराजकारणnagaradhyakshaनगराध्यक्ष