शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंबड येथे व्यापाऱ्याचे घर फोडून सहा लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:19 IST

शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

अंबड : शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.अंबड शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणारे व्यापारी सोहनलाल लालचंद राठी यांची त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरच गोपाल ट्रेडींग कंपनी या नावाने किराणा दुकान आहे. त्यांच्या घरामध्ये सोहनलाल राठी व त्यांची पत्नी गंगाबाई राठी असे दोघेच राहतात. ते दोघे ११ जूनला सकाळी ११ वाजता घराला कडी - कुलूप लावून खामसवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते.तेथील कार्यक्रम आटोपून ते १२ जूनला अंबड येथे परतले असता, त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच याची माहिती अंबड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी त्यांच्या वरच्या मजल्यावरील घराचे कुलूप तोडून आत प्रेवश करून हा डाव साधला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, पो.उप.नि.शैलेश शेजूळ, सुग्रीव चाटे, स.पो.उप.नि.शेळके, जमादार शहाजी पाचारणे, हर्षवर्धन मोरे, के.बी.दाभाडे, वंदन पवार, महेंद्र गायके, संतोष हावळे, गोफणे, खैरकर, गोतीस, देशमुख, संदिप जाधव आदींनी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अंबडमध्ये राठी यांचे घर फोडून चोरट्यांनी जी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यवस्तीत चोरट्यांनी ही हिंमत दाखवल्याने पोलिसां समोर आता चोरट्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरीची गंभीर दखल घेतली असून, उपविभगीय अधिकारी सी.डी. शेवगण यांनी यात लक्ष घालून तपासाची चक्रे आणखी गतीने फिरवण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण हे दुष्काळामूळे वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी