शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

कृषीसोबतच आता शिक्षणातही पाणलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:25 IST

जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना येथे कार्यरत असलेल्या मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्यावतीने गेल्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणलोटाची कामे करण्यात आल्याने ती गावे पाणीदार झाली आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ज्ञानगंगा गावोगावी पोहचवून जणू शिक्षणातही पाणलोट करून मुलांना बदलत्या प्रवाहात आणून सोडले आहे.मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि त्यांचे सहकारी यांनी २००३ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. महिन्याला शेतकऱ्यांना चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शेती व्यवसायात शिक्षित करण्याचा सुरू केलेला प्रयत्न आजही कायम आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात कृषी विज्ञान केंद्रामुळे चांगले परिवर्तन घडून आले. ब-याच शेतक-यांच्या यशोगाथा तयार झाल्या. ते कृषी विज्ञान केंद्रामुळे. पाणलोटमध्येही आसरखेडा असो की कडवंची ते शिवणीसह बहुतांश गावांनी वाहते पाणी थांबविले. यामुळे पाणलोटाची कामे झालेली गावे आजही भयावह दुष्काळावर मात करीत आहेत.कृषी विज्ञान केंद्रात हजारो महिला, युवक व युवतींना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले गेले. रेशीम उद्योगपासून ते शेळीपालनापर्यंत शेतीपुरक व्यवसायाची सुरुवात मोठ्या प्रमाणात महिला तसेच पुरुषांनी केली आहे.हे काम करीत असताना मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या नजरेतून सद्य स्थितीतील शिक्षणातील स्पर्धा सुटली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येथे निवासी शाळा असावी असा विचार पुढे आल्यानंतर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे तसेच कृषीभूषण भगवानराव काळे आणि येथील विश्वस्त यांनी आमची शाळा नावाची निवासी शाळा २००३ मध्ये खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू केली. २००८ मध्ये दहावीची पहिली बॅच १०० टक्के निकाल देऊन बाहेर पडली.मुलींनाही शिक्षण२०१२ च्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलींनाही येथे शिक्षण देण्यात आले. एवढेच नाही तर २००४ मध्ये कृषी तज्ञ विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयातून जवळपास ५०० विद्यार्थी कृषी पदविकाधारक बनले. जिल्ह्यात कृषी शिक्षणात मानाचा तुरा खोवणाºया कृषी महाविद्यालयाची सुरूवात २००८ मध्ये करण्यात आली. या महाविद्यालयात आतापर्यंत जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण पूर्ण करून बहुसंख्येने आता आपल्या पायावर उभे आहेत.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळEducation Sectorशिक्षण क्षेत्रSocialसामाजिक