शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

वाळूमुळे पाच जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग, विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:42 IST

विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी केली तहसील कार्यालयात बंद दाराआड चर्चा; वाळू तस्करांना आवरणार कोण?

- प्रकाश मिरगेजाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात भारज - पासोडी रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचा अवैध पुरवठा करणाऱ्या वाहनामुळे पाच मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शनिवारी घडली. या अवैध वाळू तस्करीला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, रविवारी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाफराबाद तहसील कार्यालयात महसूल व पाेलिस अधिकाऱ्यांसोबत दुपारी बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, टिप्पर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी महसूल, पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने वाळूचा धंदा जोरात सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून, ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल, पोलिस यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटाला राजकीय पाठबळसुद्धा जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रविवारी जाफराबाद येथे विभागीय आयुक्तांनी बंद दाराआड बैठक घेऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी डावरगाव देवी येथील वाळूघाटाची पाहणी केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार डॉ. सारिका भगत, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखलचोरून वाळूची वाहतूक करणारा टिप्पर चालक संतोष शेषराव कोल्हे (रा. जाफराबाद) व टिप्पर मालक गोपाल गवळी (रा. खापरखेडा) यांना जाफराबाद पोलिसांनी अटक केली आहे. टिप्पर चालक संतोष कोल्हेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, संतोष कोल्हे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर टिप्पर मालक गोपाल गवळी यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

टॅग्स :sandवाळूJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय