शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुठे शाळा, कुठे मंदिरातून गावचा कारभार; जालन्यात १७६ ग्रामपंचायतींना इमारतच नाही

By विजय मुंडे  | Updated: July 13, 2023 07:05 IST

मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे.

जालना : एकीकडे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या घोषणा शासन करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील १०-२० नव्हे तब्ब्ल १७६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारतीच नाहीत. परिणामी कुठे शाळेत बसून, कुठे मंदिरात बसून तर कुठे खासगी इमारतीचा वापर करीत गावाचा गाडा हाकण्याची वेळ गावकारभाऱ्यांवर आली आहे. विशेषतः पाठीवर दप्तर घेऊन ग्रामसेवकांना फिरावे लागत असून, गावाच्या विकासाला गती मिळणार कशी अन् डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होणार कसे असाच प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावखेड्यात अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे. कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते, ग्रामोद्याेग, सहकाराच्या विविध योजना गावस्तरावर राबविण्यात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह इतर बाबींवर ग्रामपंचायतीकडून कामकाज केले जाते. परंतु, ही कामे करण्यासाठी मासिक बैठका घ्याव्या लागतात. या बैठका घेण्यासाठी जागाच नसेल तर गाव कारभारी आणि अधिकाऱ्यांची मोठी पंचायत होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील १७६ गावांची आहे. ग्रामपंचायतीला इमारत नसल्याने कुठे शाळेच्या खोलीत, कुठे मंदिरात तर कुठे अंगणवाड्यांच्या इमारतीत बसून गावाचा कारभार हाकण्याची वेळ अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर आली आहे. विशेषतः डिजिटल इंडियाचे स्वप्न शासन पाहत असले तरी या ग्रामपंचायतींत संगणकाचाही पत्ता नाही. महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी खोली किरायाणे घेण्याची वेळ अनेक ग्रामपंचायतींवर आली आहे. अशा स्थितीमुळे गावांच्या विकासाला ब्रेक लागला असून, याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिलाग्रामपंचायतीची इमारत नसल्याने मासिक बैठका हनुमान मंदिरात होतात. इमारतीअभावी कामकाजात अडचणी येत असून, इमारत उपलब्ध व्हावी, यासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिला आहे.- अर्चना झाेल, सरपंच, रामतीर्थ, ता. मंठा

कामात अडचणी येतातग्रामपंचायत इमारतीचे काम २०२१ पासून रखडले आहे. त्यामुळे मासिक बैठका शाळेच्या खोलीत घ्याव्या लागतात. कामात अडचणी येतात. ग्रामपंचायत इमारतीचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- विमल आठवे, सरपंच, मापेगाव (बु.)

सुसज्ज इमारतीची मागणीग्रामपंचायतीची एकच खोली आहे. त्यात संगणक रूम, बैठक हॉल, पदाधिकाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. अपुऱ्या जागेमुळे कामात अडथळे निर्माण होत असून, सुसज्ज इमारतीची मागणी केली आहे.संगीता राठोड, सरपंच, येवला

इमारत नसलेल्या ग्रामपंचायतीतालुका ग्रामपंचायतीजालना- २४बदनापूर- १५अंबड- २१घनसावंगी- ३२परतूर- १६मंठा- २८भोकरदन- २७जाफराबाद- १३

टॅग्स :Jalanaजालनाgram panchayatग्राम पंचायत