शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासनाचा अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:41 IST

आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत शाळांकडून होणाºया मनमानी कारभाराला शिक्षण विभागाने लगाम लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेत शाळांकडून होणाºया मनमानी कारभाराला शिक्षण विभागाने लगाम लावला आहे. २० सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. जी प्रवेशित विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासणार आहे. त्यामुळे कागदपत्रामध्ये त्रुटी दाखवून प्रवेश नाकारणाºया शाळांवर अंकुश बसणार आहे.आरटीईच्या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण विभागामार्फत आॅनलाईन सोडत काढण्यात येते. त्यानुसार मिळालेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रता दर्शक कागदपत्रे सादर करावी लागतात. काही शाळा कागदपत्रामध्ये त्रुटी काढून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवत असल्याच्या अनेक तक्रारी जि.प. शिक्षण विभागाला मिळाल्या होत्या. तसेच अनेक शाळा आपला मनमानी कारभार करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत होत्या. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने तालुकास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. समिती योग्य पध्दतीने नियोजन करुन मुलांच्या कागदपत्राची पडताळणी करतील. पात्र विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी आपल्या स्वाक्षरीने संबंधित शाळेला पत्र देतील.पडताळणीत अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येईल. रद्द केलेल्या प्रवेशाबाबत संबंधित पालकांना त्यांच्यावर अन्याय होत आहे, असे वाटल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिका-याकडे दाद मागता येईल.यासंदर्भात पुनर्पडताळणी करुन योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.प्रवेशासाठी वंचित व दुर्बल गट पाडण्यात आले आहेत. वंचित गटात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (ब), (क) , (ड), इतर मागास वर्ग(ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), एस.ई.बी.सी, दिव्यांग बालके, एच.आय.व्ही बाधित, किंवा एचआयव्ही प्रभावित बालके हे वंचित गटात समाविष्ट आहेत. या प्रवर्गास अर्ज करताना रहिवासी दाखला, जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर दुर्बल गटात अर्ज करणा-यांना रहिवासी जन्म तारखेबरोबरच उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. यंदा आरटीई प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या पालकांचा २०१७ - १८ किंवा सन २०१८ - १९ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येईल. तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा आवश्यक राहील.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणJalna z pजालना जिल्हा परिषद