शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद

By विजय मुंडे  | Updated: September 6, 2023 11:37 IST

 घाबरू नका, प्रशासन सर्व ते सहकार्य करेल; अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे ग्रामस्थांना आश्वासन

- पवन पवारवडीगोद्री : लाठीहल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी बुधवारी सकाळी अंतरवाली सराटी ग्रामस्थांशी संवाद साधला. चौकशीसाठी पोलिसांची वाहने गावात आली तरी घाबरू नका, प्रशासनाचे तुम्हाला सर्व ते सहकार्य राहिल, अशी ग्वाही सक्सेना यांनी अंतरवाली सराटी ग्रामस्थांना दिली. तसेच सक्सेना यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेवून संवाद साधला.

अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज नववा दिवस असून, बुधवारी सकाळी ८ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून उपचार केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. घटनेनंतर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या बाबत सखोल चौकशी होईल. याबाबत पोलिस अधीक्षक चौकशी करतील असेही अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितले.

त्यानंतर समनवय समितीचे सदस्य, सरपंच यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित अनेकांनी चुकीच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. जे बाहेरगावी होते, अशांचीही नावे आरोपी म्हणून आल्याचेही सांगण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांसह महिला उपस्थित होत्या.

गावकऱ्यांनी ठरवली आचारसंहितासमन्वय समिती प्रशासनाच्या संपर्कात आहे. गावात शांतता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी काही अचार संहिता तयार केली जाणार आहे. यात गावात येणाऱ्यांनी घोषणाबाजी करू नये, मद्यपिवून कोणीही गावात येवू नये, गोंधळ घालू नये आदी सूचना दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे सूचना फलक गावात लावून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्यातील आंदोलन सर्वांनी शांततेत करावे, असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसMaratha Reservationमराठा आरक्षण