शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:00 IST

वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात दोन दिवसाला दोन अपघात, तर दोन दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई हे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वर्षभरात एक दिवसाआड एकाचा मृत्यू होत आहे.जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्ह्यातून पाच राज्य महामार्ग जातात. यामध्ये औरंगाबाद- जालना, जालना -नांदेड, जालना - देऊळगावराजा, जालना-सिंदखेड राजा, जालना - अंबड यांचा समावेश आहे. यातील जालना-अंबड महामार्ग खुपच अरूंद आहे. त्यातच या मार्गावरून ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर कोंडीसह अपघात जास्त होतात. याच मार्गावर जास्त अपघाताची नोंद असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते.या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहनधारकांपर्यंत जनजागृती ख-या अर्थाने पोहचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे. ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, यासारखे फलक सर्वत्र दिसतात.अंबड रोडवर सर्वाधिक अपघातगेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरण न झाल्यामुळे अंबड रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होतात. रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच दुहेरी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले आहे. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या चौपदरी करणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू