शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

ओव्हरटेक करताना अंदाज चुकला अन् पिकअप महामार्गावर उलटला; २० जण जखमी, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:48 IST

वडीगोद्रीजवळ पिकअप उलटल्याने त्यातील २० जण जखमी झाले आहेत.

वडीगोद्री ( जालना ) : जालना-वडीगोद्री राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ पिकअपचा अपघात होऊन २० जण जखमी झाले आहेत. तर ३ जणांची प्रकृति चिंताजनक आहे. १० जणांवर जालना येथे उपचार सुरु असल्याची माहिती आहे.                     अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथील सय्यद कुंटुबातील एका मुलीचा दि.११ मार्च रोजी विवाह सोहळा पार पडल्याने आज दि १२ मार्च रोजी ओलिमासाठी लहान मुलासह महिला व पुरुष तिंतरवणी ( जिल्हा बीड ) येथे पिकअप ( एम.एच.२१ एक्स ८१७८ ) या वाहनातून जात होते.  वडीगोद्रीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना चालकाला समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने पिकअप रस्त्यावर उलटला. यात  २० जण जखमी झाले आहेत. तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

सदरील घटना घडल्याचे कळताच वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुशिल जावळे यांनी जखमींना ताबडतोब उपचार मिळण्यासाठी रुग्णांना १०२ व १०३ रुग्णवाहिकेने अंबड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यासाठी तसेच धाकलगावचे उमेश माळवदे, साळीकराम बाळसराफ व सतीश ढोणे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.  अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी मदत करत उपचारासाठी अंबड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तेथून जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात अरबाज रहमोद्दीन शेख ,(वय १५) दाढेगाव,मोसिन नबी सय्यद ,(वय १२) पि.सिरसगाव,हुसेन हबीब सय्यद,(वय  ४३ ) पि.सिरसगाव,तनविर हुसेन सय्यद ( वय १६ ),पि.सिरसगाव,गफर तान्हु शेख,( वय ,६२ ) दाढेगाव,हबीब सय्यद,(वय ६५ ) पि.सिरसगाव,रिहान हुसैन सय्यद (वय ५८ ),अदील शेख,गेवराई,( १० वर्षे )इरफान शेख, ( ११ वर्षे ) औरंगाबाद,सोहेल शेख(१२ वर्षे) या सर्वाना जालना येथे उपचार सुरू असून यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

रहीमोद्दीन गफर शेख( ३७ वर्षे),दाढेगाव,फरजाना रहीमोद्दीन शेख ,( ३४ वर्षे ) दाढेगाव,सना रहीमोद्दीन शेख( १४ वर्षे) दाढेगाव,अल्फीया नबी सय्यद( १२ वर्षे) पि.सिरसगाव,कुलसुम गफूर शेख, दाढेगाव, ( ५५ वर्षे) अलिशान रसिद  सय्यद, (५१ वर्षे)  मातोरी जि.बिड, मेहमुदा हबीब शेख( ५२ वर्षे),पि. सिरसगाव,सिमरन शफीक शेख( २५ वर्षे) जातेगाव जि.बिड,रिजवाना महेबुब सय्यद रामगव्हाण (३० वर्षे )जि.बिड.सिम्रन रफिक शेख (२३ वर्षे) जातेगाव यांच्यावर अंबड येथे उपचार सुरु आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना