शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

तीन दिवसांपासून गायब एसीबीचे पोलीस निरीक्षक सांगलीत दिसले; शोधासाठी दोन पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 19:12 IST

अंबड व औरंगाबाद चौफुली परिसरात ते एका वाहनातून जाताना पोलिसांना दिसले.

जालना : पत्नीला भाकरी करायला सांगून घराबाहेर पडलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवारी ते सांगली शहरात दिसून आले असून, मित्राकडे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहे.

जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे शहरातील यशवंतनगर भागात राहतात. बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास पत्नी व ते सोबत होते. पत्नीला भाकरी करायला सांगून ते बाहेर पडले. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन, खिशातील वॉच पाकिटही सोबत नेलेले नाही. घटनेची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे व पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ताटे यांचा शोध घेण्यात आला. परंतु, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे रात्री उशिरा ताटे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 

पोलिसांनी बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. अंबड व औरंगाबाद चौफुली परिसरात ते एका वाहनातून जाताना पोलिसांना दिसले. त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती. शिवाय, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांनाही सांगण्यात आले होते. शनिवारी सांगली शहरात फिरत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्हीत ते दिसून आले. सांगली येथे त्यांचा मित्र असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके सांगलीला रवाना झाली आहे.

शोधासाठी दोन पथके सांगली येथे रवानापोलीस निरीक्षक ताटे यांचा शोध सुरू आहे. सांगली शहरात ते दिसून आले आहे. त्यानुसार त्यांच्या शोधासाठी दोन पथके सांगली येथे रवाना करण्यात आली आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल.- विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालना