शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जालन्याचा युवा वारकरी नीरा नदीत बुडाला; विठ्ठला, माझ्या गोविंदाला सुखरूप ठेव...आईचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:06 IST

ग्रामस्थ आई-वडिलांना धीर देतानाच घराच्या दारावर असलेल्या विठ्ठलाचा फोटो पाहून गोविंद सुखरूप राहावा, यासाठी प्रार्थना करीत होते.

सराटी/अंबड (जि. पुणे/ जालना) : अंघोळीसाठी नीरा नदीत उतरलेला जालन्यातील युवा वारकरी मंगळवारी सकाळी पाण्यात वाहून गेला. एनडीआरएफच्या पथकाकडून दिवसभर या युवकाचा शोध सुरू होता. ही घटना इंदापूर तालुक्यातील सराटी गावाच्या नीरा नदीच्या किनारी मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली. गोविंद कल्याण फोके (वय २०, रा. झिरपी, ता. अंबड. जि. जालना) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. या दिंडीत तो आजीसोबत गेला होता. 

मंगळवारी सकाळी नीरा नदीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानाची तयारी नदीच्या सराटी गावाकडच्या दिशेने सुरू होती. अकलूजकडे जाणाऱ्या दिशेने गोविंद हा स्नानासाठी नीरा नदीत उतरला होता. त्याचवेळी तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी निघालेला गोविंद ऊर्फ आकाश कल्याण फोके (वय १९, रा. झिरपी, ता. अंबड) हा हरवल्याची माहिती मंगळवारी सकाळी मिळताच त्याचे आई-वडील चिंतीत झाले होते. 'विठ्ठला माझ्या गोविंदाला सुखरूप ठेव..' असा धावा हंबरडा फोडत आई करीत होती.

घुंगर्डे हदगाव येथील हभप विष्णू महाराज मस्के यांच्या दिंडीत १८ जूनपासून गोविंद फोके (रा. झिरपी) व त्याची आजी प्रयागबाई खराबे (रा. एकलहरा) हे सहभागी झाले होते. सदरील दिंडी ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीमधील १२ नंबरची दिंडी आहे. प्रयागबाई खराबे गतवर्षीपासून दिंडीत जात होत्या. गोविंद यंदा प्रथमच दिंडीत सहभागी झाला होता. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्नान सोहळा माळशिरस तालुक्यातील सराटी गावातील नीरा नदीत सुरू असताना आकाशदेखील नदीत गेला होता. परंतु, तो पाण्याच्या प्रवाहात बुडाला. गोविंद पाण्यात वाहून गेल्यानंतर नातेवाइकांनी आई नम्रता फोके आणि वडील कल्याण फोके यांना मुलगा दिंडीत हरवल्याची माहिती दिली. मुलगा हरवल्याचे समजताच आई-वडिलांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमा झाले. आईने तर एकच हंबरडा फोडला. दिवसभर नातेवाईकही त्यांची भेट घेऊन धीर देत होते.

एकुलता एक मुलगागोविंद फोके हा एकुलता एक मुलगा असून, त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून, तो अंबड येथील एका दुकानात काम करतो. मोलमजुरी, शेतीतून फोके कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

राजेश टोपे घटनास्थळीघटनेची माहिती मिळताच माजी मंत्री राजेश टोपे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आजी प्रयागबाई खराबे यांना धीर दिला. तसेच आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी संवाद साधून शोधकार्याबाबत सूचना दिल्या.

आजोळीही चिंतेचे वातावरणगोविंद हा नदीपात्रात बुडाल्याची माहिती मिळताच त्याचे मामा व इतर नातेवाईक घटनास्थळाकडे रवाना झाले. तर एकलहरा येथील आजोळी आजोबा प्रभाकर खराबे व त्याची मामी असून, त्याच्या आजोळीही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

घराच्या दारावर विठ्ठलाचा फोटोकल्याण फोके यांच्या घराच्या दारावर मोठा विठ्ठलाचा फोटो आहे. गोविंद पाण्यात बुडाल्याचे समजताच चिंतीत झालेले नातेवाईक आणि गावकरी फोके यांच्या घराकडे जात होते. त्याच्या आई-वडिलांना धीर देतानाच घराच्या दारावर असलेल्या विठ्ठलाचा फोटो पाहून गोविंद सुखरूप राहावा, यासाठी प्रार्थना करीत होते.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Jalanaजालना