शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

घनसावंगीत टोपे, उढाण अन् घाटगेंमध्ये तिरंगी लढत; मतमोजणीच्या होणार 26 फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 19:20 IST

मतमोजणी 14 टेबलवर 26 फेऱ्यामध्ये होणार आहे

अंबड : घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 354 बूथच्या ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी 14 टेबलवर 26 फेऱ्यामध्ये होईल. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजीमंत्री राजेश टोपे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण, महाविकास आघाडीतील बंडखोर अपक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे, महायुतीमधील बंडखोर सतीश घाटगे यांच्यासह अन्य 23 उमेदवार मैदानात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल हे सांगणे कठीण आहे. 

अंबड तालुक्यातील 53 आणि घनसावंगी तालुक्यातील 117 जालना तालुक्यातील 42 अशी असा 212  गावे घनसावंगी मतदारसंघातील समावेश आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरील अंतिम टक्केवारी 77.16 % एवढी आहे. म्हणजेच सुमारे 2 लाख 54 हजार 880 मतदारांनी आपले मतदान केले. यात पुरुष 1लाख 34हजार 739 व महिला 1 लाख 30 हजार 121 मतदारांनी आपले कर्तव्य बजावले.

मतमोजणीच्या होणार 26 फेऱ्या उद्या सकाळी 8 वाजता घनसावंगी येथील राजेगाव रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. एकूण 14 टेबलवर मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक व वर्ग 4 चे कर्मचारी असे एकूण 116 अधिकारी-कर्मचारी यांची  नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त 60 अधिकारी-कर्मचारी इतर मतमोजणी विषयक कामकाजासाठी नियुक्त आहेत. तसेच 130 पोलीस अधिकारी, कर्मचारी, 24  राज्य राखीव पोलीस दल, 40 होमगार्ड तसेच स्टाँगरुम करिता 24 बीएसएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

टोपे आणि उढाण यांची यंत्रणा होती सज्ज माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी निवडणुका जाहीर होताच प्रचार सुरू केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचेच वर्चस्व असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेला मानणारा वर्ग आपल्या सोबत ठेवण्यात यश मिळवले आहे. यासोबतच भाजपचे बंडखोर सतीश घाटगे यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढत मोठे आव्हान निर्माण केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024