शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला उडवले; पाच जणांचा जागीच मृत्यू, मृतात एकाच कुटुंबातील चौघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 18:47 IST

माहोरा ते जाफराबाद रोडवर झाला भीषण अपघात

- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना): माहोरा - जाफराबाद रोडवर ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात देऊळगाव राजा येथील पाच जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजता घडली. मृतांमध्ये एकाच कुटूंबातील चार जणांचा समावेश आहे.

याबाबतची माहिती अशी की, कैफ अशपाक शहा ( 19) हा मित्र मनीष बबन तिरुखे ( 26, राहणार त्रंबकनगर तालुका देउळगाव राजा जिल्हा बुलढाणा )  याला सोबत घेत रिक्षातून ( क्रमांक एम एच 28 बीए 0256 ) माळवंडी ( ता. बुलढाणा )  येथे बहिणीला आणण्यासाठी गेला होता. आज दुपारी ते दोघे बहीण परवीन बी राजू शहा ( 25), आलिया राजू शहा ( 7 ), मुस्कान राजू शहा ( 3 ) यांच्यासह देऊळगाव राजाकडे निघाले.

दरम्यान, माहोरा ते जाफराबाद रोडवर जाफराबादकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( एम एच 28 बीबी 2357 ) रिक्षाला उडवले. यात रिक्षातील कैफ अशपाक शहा, परवीन बी राजू शहा, आलिया राजू शहा, मुस्कान राजू शहा या एकाच कुटुंबातील  चार आणि मनीष तिरुखे अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाळू खरात ( 23)  व सानिया शहा ( 9 ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भीषण अपघातानंतर नागरिकांनी धावपळ करून सर्वांना बाहेर काढत जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच जाफराबादचे सपोनि राजाराम तडवी, भोकरदनचे सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक मदन, गणेश पायघन यांच्यासह कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले. 

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू