शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मूर्तींचा शोध लागेना; माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर

By दिपक ढोले  | Updated: October 13, 2022 16:33 IST

२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून पंचधातूच्या चार मूर्ती चोरी जाऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना मूर्तींचा शोध लागला नाही. शेवटी मूर्तींची माहिती देणाऱ्यास जिल्हा पोलीस दलाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले असून, मूर्तींसंदर्भात कुठलीही माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पुजारी धनंजय वसंतराव देशपांडे यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. अनेक गुन्हेगारांची चौकशी केली. शिवाय, गावासह परिसरातही तपासणी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी मुंबईसह देशभरात मूर्तींचा शोध घेतला. परंतु, काहीच हाती लागले नाही. या घटनेला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे. मूर्तींचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह राज्यकीय नेत्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, मूर्तींचा शोध लागत नसल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मूर्तींची माहिती देणाऱ्यास जवळपास २ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यांच्याशी करा संपर्कनागरिकांना मूर्तींची माहिती मिळाल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सपोनि. योगेश धाेंडे, पोउपनि. प्रमोद बोंडले यांच्यासह नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाचशे वर्ष जुन्या आहेत मूर्ती  तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी २२ ऑगस्ट रोजी पाहटे श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना