शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

३० लाखांत खवले मांजर विक्रीसाठी आले अन् सहा तस्कर वनविभागाच्या सापळ्यात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:08 IST

वाशिम जिल्ह्यातील एकाकडे खवले मांजर असून, तो त्याची तस्करी करणार असल्याची माहिती जालन्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली होती.

जालना : ३० लाख रुपयांत खवले मांजर विक्री करण्यासाठी जालन्यात आलेल्या वाशिम, हिंगोली, जालन्यातील सहा जणांना वनविभागाने शुक्रवारी ७ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खवल्या मांजरासह तीन कार जप्त करण्यात आल्या.

वाशिम जिल्ह्यातील एकाकडे खवले मांजर असून, तो त्याची तस्करी करणार असल्याची माहिती जालन्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांना मिळाली होती. नागरगोजे यांनी डमी ग्राहक होऊन त्या व्यक्तीशी संपर्क साधला. तसेच ३० लाखांत खवले मांजर खरेदीची तयारी दर्शविली. ३० लाखांत खवले मांजर विक्री होत असल्याने पाच जण शुक्रवार दि. ७ मार्च रोजी दोन कारमधून (क्र. एमएच ३७- एडी ९६०७ व एमएच ४३- बीपी ४५६८) जालना शहरातील मंठा चौफुली भागात आले. कारमध्ये खवले मांजर असल्याची खात्री होताच नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या पाच जणांसह खवले मांजर, एक कार जप्त केली. या प्रकरणात वाशिम जिल्ह्यातील पाच जणांविरोधात वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर आणखी एक कार (क्र. एमएच १४- बीएक्स ८७३७) आणि सहाव्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

हे आहेत सहा आरोपीवनविभागाने ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय उकंडा राठोड (रा. गिरोली, ता. जि. वाशिम), सुनील नामदेव थोरात (रा. चौंडी, ता. वसमत, जि. हिंगोली), नारायण पूजाराम अवचार (रा. विडोळी, ता. मंठा, जि. जालना), प्रताप गुलाबराव सरनाईक (रा. हिवरा, ता. रिसोड), अनिल अशोक साळवे (रा. ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौकशीनंतर एकनाथ अनिल इंगळे (रा. लाखला, ता. जि. वाशिम) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सु. न. मुंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. दौंड, वनपरिमंडळ अधिकारी आर. डी. दुनगहू, वाय. एम. डोमळे, वनपाल व्ही. पी. अवचार, बी. एम. पाटील, के. जी. शिंगणे, मुटके, के. जी. कदम, के. बी. वाकोदकर, डी. व्ही. पवार, जे. टी. नागरगोजे, वनरक्षक बालाजी घुगे, महादेव कळमकर, सुदाम राठोड आदींनी कारवाई केली.

खवले मांजर नैसर्गिक अधिवासातआरोपींना १० मार्चपर्यंत एफसीआर मंजूर करण्यात आला. तर न्यायालयाच्या आदेशानुसार खवले मांजर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी