शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित शेतकऱ्याची वेगळी वाट; जिरेनियम शेतीतून कमावतोय एकरी दोन लाख

By विजय मुंडे  | Updated: August 14, 2023 18:55 IST

सुगंधी तेलासाठी जिरेनियमचा वापर, मुंबईतील कंपनी शेतातून नेते सुगंधी तेल

- अशोक डोरलेअंबड : मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सेट-नेट परीक्षेत यश मिळविलेले गोंदी (ता. अंबड) येथील शेतकरी शिवाजी जगन्नाथ गायके हे सुगंधी तेल उत्पादनासाठी लागणाऱ्या जिरेनियमची शेती करत आहेत. याद्वारे एका एकरातून त्यांना वार्षिक दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

शिवाजी गायके यांची गोंदी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. शिवाजी गायके हे उच्च शिक्षण घेऊन नॉन ग्रॅन्ट कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. नोकरी करताना त्यांना जिरेनियम शेतीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या हवामानात वाढणारी बहुवार्षिक, झुडुपवर्गीय सुगंधी वनस्पती तीन एकरात लागवड केली आहे. लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीत एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत (कंपोस्ट खत) टाकले. तसेच प्रति एकर ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २६ किलो पोटॅश म्युरेट, १५ किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि १० किलो झिंक सल्फेट खतांची मात्रा दिली. जिरेनियम वनस्पतीचे आयुष्य तीन वर्षांचे आहे. त्यामुळे दरवर्षी वरीलप्रमाणे खतांची मात्रा त्यांनी दिली. सुगंधित वनस्पती असल्याने किडीचा अजिबात त्रास होत नाही. जनावरेही याला तोंड लावत नाहीत. यामुळे संरक्षणासाठी स्वतंत्र खर्च करावा लागला नसल्याचे शिवाजी गायके सांगतात. या शेतीतून त्यांना वार्षिक दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

वर्षाला होतात चार कापण्यादर तीन महिन्यांनी पानांची कापणी केली जाते. अशा वर्षातून चार कापण्या होतात. एका तोडणीला खर्च वजा जाता ५० हजारांचे उत्पन्न मिळते. तोडणीनंतर शेतातील प्लॅंटवर पानांतून तेल काढले जाते. या निघणाऱ्या सुगंधी तेलाला प्रति किलो ८ हजारांचा भाव आहे. यापूर्वी तो दर १२ हजार रुपये होता. मुंबईतील एक कंपनी हे तेल खरेदी करते.

चांगले उत्पन्न मिळते योग्य नियोजन करून जिरेनियमची शेती केल्यास वार्षिक एकरी दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. किडीचे आणि जनावरांपासून संरक्षणाचे टेन्शन नाही. शिवाय या वनस्पतीला मागणी असल्यामुळे चांगल्या उत्पन्नासाठी या पिकाकडे पाहता येईल.- शिवाजी गायके, प्रगतशील शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना