शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

स्तुत्य निर्णय! १ कोटींचे राहते घर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, मुलींच्या हॉस्टेलसाठी दान

By विजय पाटील | Updated: July 25, 2023 19:39 IST

वृद्ध दाम्पत्याचा स्तुत्य निर्णय; या कामासाठी ट्रस्ट स्थापन करणार पण अध्यक्षपद स्वीकारणार नाही

- विजय मुंडे 

जालना : बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता एस.एन. कुलकर्णी (८१) व त्यांच्या पत्नी रजनी कुलकर्णी (७७) या दाम्पत्याने जालना शहरातील भाग्यनगर भागातील २८०० स्क्वेअरफुटावरील राहते घर, स्वातंत्र्यवीर सावरकर भवन व मुलींच्या वसतिगृहासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

जालना शहरातील भाग्यनगर भागातील निवासस्थानी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होते. सेवानिवृत्तीनंतर एस.एन. कुलकर्णी यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले होते. जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमिचे झालेले सुशोभिकरण असो किंवा तीर्थक्षेत्र राजूर येथील मंदिराचे बांधकाम असो या कामात त्यांनी मोठा हातभार लावलेला आहे. कुलकर्णी दाम्पत्यास दोन मुले, एक मुलगी आहे. स्वत:च्या संपत्तीतील आवश्यक तो हिस्सा मुलांना दिल्याचे कुलकर्णी म्हणाले.

आजवर अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आपण प्रेरित झालो आहोत. त्यामुळे आपल्या राहत्या घराच्या जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन उभे रहावे, असा आपला मानस आहे. त्यामुळे आपले २८०० स्क्वेअरफुटावरील राहते घर आपण सावरकर भवन आणि मुलींच्या वसतिगृहासाठी दान करण्याचा निर्णय आम्ही दाम्पत्यांनी घेतला आहे. बाजारभावानुसार जागेची किंमत एक कोटी रूपयांच्या पुढे आहे. परंतु, या जागेवर स्वातंत्र्यवीर सावरकर भवन आणि मुलींचे वसतिगृह उभे रहावे, असे आपले स्वप्न असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

आलो इथे रिकामा बहरून जात आहे..स्वातंत्र्यवीर सावरकर भवन व मुलींचे वसतिगृह तयार करण्यासाठी २५ जणांचे ट्रस्ट उभा केले जाणार आहे. ट्रस्टचे अध्यक्षपद आपण भूषविणार नाही. ट्रस्टचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त झाल्यानंतर एकाच वर्षातच इमारतीचे बांधकाम पूर्ण व्हावे, असा आपला मानस आहे. 'आलो इथे रिकामा बहरून जात आहे', या उक्तीप्रमाणे याची देही, 'याची डोळा हे काम व्हावे', यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही एस.एन. कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरEducationशिक्षण