शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन कंपन्यांच्या माध्यमातून सहा कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:03 IST

जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांचे सहा कोटी रूपये घेऊन त्याचा परतावा न देता कंपनीने गाशा गुंडाळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांचे सहा कोटी रूपये घेऊन त्याचा परतावा न देता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या प्रकरणी ठेवीदाराच्या तक्रारीवरून राजस्थानमधील चार आणि महाराष्ट्रातील एका विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील इंदूर येथे कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपनी गरीमा रिअल इस्टेट, गरीमा फोम आणि साक्षी मल्टिस्टेट सोसायटी या तीन वेगवेगळ्या नावाने कंपन्या दाखवून जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या काळात जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार लोकांकडून अडीच हजार ते पाच हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त ठेवी तसेच आरडी जमा केल्या होत्या. त्या सर्व ठेवींवर सरासरी १२ ते १५ टक्के व्याजदार देण्यासह निवृत्तीवेतन योजनाही राबवणार आमिष दाखवून कंपनीने म्हटले होते.मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे मिळावेत म्हणून गुंतवणुकदारांनी पाठपुरावा केला असता, कंपनीने उडवाउडवीची उत्तरे देण्यासह कुठलाच प्रतिसाद दिला नाही. यावरून जालन्यातील गुंतवणूकदार मारूती ढोणे यांनी कदीम जालना ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपविभागीय अधिकारी एस.डी. बांगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यात बांगर यांनी सांगितले की, आता पर्यंत जवळपास ३०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवले असून, त्यांना देण्यात आलेले गुंतवणुकीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती हस्तगत केल्या आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे औरंगाबादेतील बन्सीलालनगर येथे होते. तेथील व्यवस्थापन जळगाव येथील धीरज गुलाबसिंग पाटील हे पाहत होते.या प्रकरणात कदीम पोलीस ठाण्यात राजस्थानमधील धोलपूर येथील बनवारीलाल माधवसिंह कुशवाह, शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिशन कुशवाह, बनवारीलाल लोधीसह धीरज पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच पोलीस त्यांना अटक करतील असेही बांगर यांनी स्पष्ट केले.जालना : रत्नागिरी येथील जमीन जप्त करण्याची तयारीया कंपन्याच्या नावावर रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २०० एकर जमीन खरेदी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. ही जमीन जप्त करण्यासाठी जालना तसेच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन ही कारवाई करण्यात येणार आहे. जेणेकरून ठेवीदारांची काही रक्कम त्यातून वसूल करणे शक्य होणार आहे. तसेच महाराष्ट्रात ठेवीदारांच्या रक्षणासाठी नव्याने करण्यात आलेला एमपीआयडी या काद्यानुसारही संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल केल्याचे बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हा